Vastu Tips For Sleeping: रात्री झोपताना डोकं या दिशेला करावं! अनेकजण करतात चूक, फायदे अनेक

Last Updated:

Vastu Tips For Sleeping: प्राचीन धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्र दोन्हीही यावर भर देतात की, झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व किंवा दक्षिण आहे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, जी प्रकाश आणि उर्जेचे प्रतीक आहे.

News18
News18
मुंबई : वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले गेले आहे. अनेकजण चुकीच्या दिशेला डोकं करून झोपतात, ज्यामुळे त्यांना आजार आणि तणावाशी झुंजावे लागते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, व्यक्तीने नेहमी योग्य दिशेला डोके करून झोपावे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्या मते झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य मानली जाते ते जाणून घेऊया.
पूर्व दिशा -
प्राचीन धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्र दोन्हीही यावर भर देतात की, झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व किंवा दक्षिण आहे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, जी प्रकाश आणि उर्जेचे प्रतीक आहे. या दिशेला डोके करून झोपल्याने मेंदूमध्ये एकाग्रता वाढते, गाढ झोप येण्यास मदत होते आणि मानसिक ताण कमी होतो.
दक्षिण दिशा -
दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हटले गेले आहे, पण ते चुकीच्या अर्थाने नाही. चुंबकीय सिद्धांतानुसार, डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असतील तर पृथ्वीचा उर्जेचा प्रवाह शरीरात योग्य दिशेने जातो, ज्यामुळे पचन सुधारते, शरीरात संतुलन राखले जाते आणि झोपेनंतर व्यक्तीला छान वाटते, म्हणून दक्षिणेला डोके करून झोपू शकता.
advertisement
उत्तर दिशा -
उत्तरेकडे डोके करून झोपणे हे केवळ वैज्ञानिकदृष्ट्या हानिकारक नाही तर शास्त्रांमध्येही ते अशुभ मानले गेले आहे. यामुळे ताण, गोंधळ, वाईट स्वप्ने आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते. म्हणून, या दिशेला डोके करून झोपणे टाळावे.
advertisement
पश्चिम दिशा -
पश्चिमेकडे डोके करून झोपल्यानं चिंता, अस्वस्थता आणि मानसिक थकवा वाढतो. ही दिशा सूर्याचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनि ग्रहाशी संबंधित मानली जाते. डोके आणि पाय या विरोधी घटकांमुळे मानसिक संतुलन बिघडू शकते.
बेडरूम वास्तू -
माणूस त्याच्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो. अशा परिस्थितीत जर झोपण्याची दिशा वास्तुनुसार नसेल तर त्याचा थेट परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. ज्यामुळे निद्रानाश, चिडचिडेपणा, भयानक स्वप्ने आणि आर्थिक अस्थिरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, वास्तुनुसार खोलीत झोपण्यासाठी योग्य जागा निवडावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips For Sleeping: रात्री झोपताना डोकं या दिशेला करावं! अनेकजण करतात चूक, फायदे अनेक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement