Jalgaon News : शेतात काम करता करता बळीराजाला मृत्यूनं गाठलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत शेतात काम करताला एका शेतकऱ्याला मृत्यूने गाठल्याची घटना समोर आली आहे. एकनाथ जगन्नाथ कांदले (वय 41) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

jalgoan newss
jalgoan newss
Jalgaon News : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत शेतात काम करताला एका शेतकऱ्याला मृत्यूने गाठल्याची घटना समोर आली आहे. एकनाथ जगन्नाथ कांदले (वय 41) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना एकनाथ जगन्नाथ कांदले यांचा जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मृत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रीक वायरचा संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तसेच या घटनेने कांदले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement

6 वर्षीय चिमुकल्याचा शेजाऱ्याच्या घरात मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा शेजारील घरात मृतदेह सापडला आहे. मागील अनेक तासांपासून मुलाचा शोध घेतला जात होता. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अनेक तास शोध घेतल्यानंतर शेजारील घरातच मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने ज्याच्या घरात मृतदेह आढळल्या त्याच्या घरावर आणि दुकानावर हल्ला केला आहे.
advertisement
दुकानावर आणि घरावर दगडफेक करत मोठी तोडफोड केली आहे. या प्रकारामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मृत बालकाचे नाव हन्नान खान (वय 6) असे आहे. तो शुक्रवार सायंकाळी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. संपूर्ण शहर पिंजून काढलं, पण मुलाचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शनिवारी सकाळी, शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावर एका बंदिस्त कोठीत हन्नानचा मृतदेह आढळला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : शेतात काम करता करता बळीराजाला मृत्यूनं गाठलं, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement