MBA केलं अन् आयडीया सुचली! नोकरी न करता घरातच सुरू केली शेती, वर्षाला करतोय ९० लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : अनेक तरुण उच्च शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसायात स्थिरावतात, पण काही जण परंपरेच्या चौकटीबाहेर जाऊन शेतीत करिअर घडवतात.
मुंबई : अनेक तरुण उच्च शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसायात स्थिरावतात, पण काही जण परंपरेच्या चौकटीबाहेर जाऊन शेतीत करिअर घडवतात. काश्मीरमधील अरुण शर्मा हा त्याचपैकी एक तरुण आहे. एमबीए केल्यानंतर कॉर्पोरेट नोकरीच्या ऐवजी त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आज तो शेतीतून वर्षाला तब्बल ९० लाख रुपये कमावतो. मग आता ही शेती कशाची आहे? त्याने यश कसं मिळवलं? हेच आपण जाणून घेणार आहोत.
MBA असूनही नोकरीऐवजी शेतीचा निर्णय
अरुण शर्मा हा काश्मीरमधील एका सुशिक्षित कुटुंबातील तरुण. त्याने एमबीए पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही घरापासून दूर राहणं त्याला पसंत नव्हतं. त्यामुळे तो स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या एका एनजीओसोबत जोडला गेला. हे एनजीओ महिलांच्या स्वावलंबनासाठी काम करत होते. यादरम्यान, सरकारकडून महिलांसाठी आयोजित बटन मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रमात त्याची उपस्थिती झाली आणि तेथूनच त्याच्या मनात मशरूम शेतीचा विचार आला.
advertisement
एका खोलीतून सुरुवात, आज ३५ टन उत्पादन
सुरुवातीला अरुणने आपल्या घरातील एका लहानशा अंधाऱ्या खोलीतून मशरूम शेतीचा प्रयोग सुरू केला. बियाणे खरेदी, उत्पादनासाठी आवश्यक तापमान नियंत्रण आणि विपणन याबाबत त्याने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्थानिक पुरवठादारांकडून १०० तयार मशरूम बॅग खरेदी केल्या. प्रत्येक बॅगची किंमत ९० रुपये असल्याने सुरुवातीचा खर्च झाला ९,००० रुपये. दोन महिन्यांनंतर त्याला पहिल्यांदा १६ हजार रुपयांची कमाई झाली.आणि तेच त्याच्या यशाचं पहिले पाऊल ठरलं.
advertisement
व्यवसायाचा विस्तार आणि वाढता नफा
पहिल्या यशानंतर अरुणने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्याने खोलीतील बॅग्सची संख्या वाढवली आणि एनजीओमध्ये काम करत राहिला. मात्र, २०१४ मध्ये त्याला जाणवले की, बाजारात मशरूमची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्याने पूर्ण वेळ या व्यवसायात उतरायचं ठरवलं. त्याने एनजीओमधील नोकरी सोडली आणि घराजवळील एका जुन्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर मशरूम शेती सुरू केली.
advertisement
आज अरुण दरवर्षी ३५ टन मशरूम उत्पादन करतो. याशिवाय, तो इतर शेतकऱ्यांना ४५ लाख रुपयांचे मशरूम खत विकतो. या दोन्ही माध्यमातून त्याला एकूण वार्षिक उत्पन्न ९० लाख रुपये मिळते.
अरुणच्या म्हणण्यानुसार, “मशरूम शेती ही केवळ शेती नसून एक शास्त्र आहे. योग्य तापमान, स्वच्छता आणि बाजारपेठेचा अभ्यास असेल तर यातून कोट्यवधींची कमाई शक्य आहे.” आज तो स्थानिक युवकांनाही मशरूम शेतीचं प्रशिक्षण देतो आणि अनेकांना रोजगार मिळवून देतो.
advertisement
तरुणांसाठी आदर्श उदाहरण
view commentsअरुण शर्मा यांची कथा केवळ आर्थिक यशापुरती मर्यादित नाही, तर ती ग्रामीण विकास आणि स्थानिक स्वावलंबनाचा संदेश देते. उच्चशिक्षित असूनही पारंपरिक नोकरीचा मोह टाळून शेतीत करिअर घडवणं ही त्यांची प्रेरणादायी वाटचाल आहे. योग्य नियोजन, तांत्रिक ज्ञान आणि चिकाटी असेल तर शेतीतही सुवर्णसंधी मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
MBA केलं अन् आयडीया सुचली! नोकरी न करता घरातच सुरू केली शेती, वर्षाला करतोय ९० लाखांची कमाई


