हिंदू धर्मात गणेशाला 'विघ्नहर्ता' मानले जाते. जीवनातील संकटे आणि अडथळे दूर करण्यासाठी गणेशाची उपासना अत्यंत फलदायी ठरते. असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली दिवस म्हणजे 'सकट चतुर्थी'. यावर्षी हा मुहूर्त 6 जानेवारी रोजी येत असून, यादिवशी केलेल्या विशेष उपायांनी जीवनात सुख-समृद्धी येते, असे आध्यात्मिक अभ्यासकांचे मत आहे.
advertisement
सकट चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व
'सकट' हा शब्द संस्कृतमधील 'संकष्टी' या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ 'कष्टांतून मुक्ती' किंवा 'अडथळ्यांचे पूर्णपणे उच्चाटन' असा होतो. या तिथीला धार्मिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातूनही मोठे महत्त्व आहे.
मुलाधार चक्राचा संबंध: लाल रंग हा आपल्या शरीरातील 'मुलाधार चक्राचा' प्रतीक आहे आणि गणपती हा या चक्राचा मुख्य अधिष्ठाता देव आहे. मुलाधार चक्र जेवढे मजबूत असेल, तेवढेच माणसाचे आयुष्य अधिक स्थिर आणि सुरक्षित होते.
चंद्र तत्त्व: ही तिथी 'चंद्र तत्त्वावर' आधारित आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि गणपती हा मनाचा नियंत्रक (Controller) आहे.
मंत्रांचा द्वारपाल: तंत्रशास्त्रानुसार, गणपतीला सर्व मंत्रांचा 'द्वारपाल' मानले जाते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो.
या दिवशी काय करावे? (पूजा विधी)
सकट चतुर्थीच्या दिवशी काही सोप्या पण प्रभावी कृती केल्याने गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो:
उपवास: या दिवशी उपवास करून गणेशाची मनोभावे भक्ती करावी.
व्रत कथा: गणेशाच्या पराक्रमाची आणि महिम्याची 'व्रत कथा' श्रवण करावी.
प्रसाद: बाप्पाला आवडणारी फळे आणि मिठाई यांचा नैवेद्य अर्पण करावा.
दुर्वा आणि लाल फुले: गणपतीला दुर्वा आणि विशेषतः लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पण करावे. लाल रंग मुलाधार चक्राला ऊर्जा देतो.
असे मानले जाते की, सकट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जुने कर्म दोष (Karma) नष्ट होतात आणि आयुष्यातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. आध्यात्मिक साधना करणाऱ्यांसाठी हा दिवस ऊर्जा आणि मन:शांती देणारा ठरतो.
