- सूर्यप्रकाश आणि ताजी हवा
वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त काळोख नसावा, हे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून नैसर्गिक प्रकाश आणि हवा घरात प्रवेश करू शकतात. घरातील विषारी पदार्थ आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघड्या ठेवणे. घर सकारात्मक राहण्यासाठी घरात ताजी हवा येणं फार महत्त्वाचे आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे उत्साह राहतो आणि घरातील लोकांचा मूडही सुधारतो, असे मानले जाते.
advertisement
- खराब/भंगार सामान
वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात, विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू. अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरात फर्निचर, घड्याळे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या तुटलेल्या वस्तू असतील तर लगेच ते सामान भंगारात घालून टाका. काही वस्तू वापरण्यास योग्य असल्यास त्या दुरुस्त करा आणि नीट करून घरी ठेवा.
संक्रातीच्या महा पुण्यकाळात करावीत ही 3 कामं; सूर्य-शनिची एकत्रित मिळेल कृपा
- घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा
घरातील वस्तू इकडे-तिकडे विखुरलेल्या असणं, नीटनेटक्या न ठेवणं, यामुळे घरातील लोकांच्या वागण्यात चिडचिड आणि नकारात्मकता निर्माण होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. त्यामुळे घरातील वातावरणात तणाव निर्माण होतो आणि सकारात्मकता निघून जाते. यासाठी आपण आपल्या घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणे आणि व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही वापरत नसलेल्या गोष्टी गरजूंना दान करा. याशिवाय तुमची खोलीही स्वच्छ ठेवा, असं केल्यानं घरात सकारात्मकतेचे वातावरण राहते.
Numerology: या जन्मतारखांची जोडपी फारच समजुतदार! दीर्घकाळ आनंदी जगतात सहजीवन
- मीठ वापरा
वास्तुशास्त्रानुसार, मीठ हा घरामध्ये वापरण्यात येणारा एक असा घटक आहे, ज्यात नकारात्मक ऊर्जा काढण्याचा गुणधर्म असतो. फरशी पुसताना पाण्यात समुद्री मीठ मिसळले तर ते तुमच्या घराचे वातावरण सकारात्मक बनवू शकते. हा उपाय गुरुवारी करू नये. याशिवाय काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या घराच्या बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे एखाद्या भांड्यात मीठ टाकून ठेवा, असें केल्यानं घरातील वास्तुदोषही दूर होतो, असे मानले जाते.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
