TRENDING:

उंदराच्या कानात सांगितल्यानंतर पूर्ण होते इच्छा, नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती

Last Updated:

उंदराच्या कानात सांगितल्यानंतर भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 18 सप्टेंबर  : कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणरायाची आराधना केली जाते.  गणपतीची अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर राज्यात आहेत. यापैकीच एक म्हणजे जालना शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेलं माळाचा गणपती संस्थान. सद्गुरु रंगनाथ महाराज यांनी या गणपतीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. ज्या झाडाखाली हा गणपती घडला त्या लिंबाच्या झाडाची पाने आजही गोड लागतात अशी आख्यायिका आहे.
advertisement

नवसाला पावणारा गणपती

भाविकांच्या इच्छा आकांक्षा आणि नवस पूर्ण करणारा गणपती म्हणून या गणेशाची ख्याती आहे. भाविक आपली इच्छा मूषक म्हणजेच उंदराच्या कानात सांगतात आणि ती इच्छा गणपती पूर्ण करतो. भाविकांनी सांगितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर ते इथे येऊन आपला नवस पूर्ण करतात.

गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शूभ मुहूर्त कोणता? पाहा काय आहे योग्य पद्धत

advertisement

भाविकांचे सोयीसाठी तिथे भक्त निवास आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.हे संस्थान खूप ऐतिहासिक आहे. गजानन महाराजांच्या काळात संत रंगनाथ महाराज यांनी ही मूर्ती घडवली आहे. आम्ही 2001 साली या मंदिराता जिर्णोद्धार केला. या ठिकाणी गरिबांच्या लग्नासाठी मंगल कार्यालयाची सुविधा आहे. भक्तनिवास देखील आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आणखी सुविधा निर्माण करण्याचा मानस असल्याचे संस्थानचे अध्यक्ष किशोर मिश्रा यांनी सांगितले.

advertisement

143 वर्ष जुने मंडळ बदलणार परंपरा, यंदा कोल्हापूरकरांना मिळणार खास पर्वणी

ही एक उजव्या सोंडेची मूर्ती आहे. सन 1818 मध्ये वैद्य चतुर्थीला या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही उजव्या सोंडेची मूर्ती अतिशय चमत्कारिक आहे. या गणपतीला गुळाचा भोग दिला जातो. इथे येणारे भक्त मूषक म्हणजेच उदिराच्या कानात आपल्या इच्छा सांगतात. त्या गणपतीपर्यंत पोहचतात. रिद्धी, सिद्धी आणि विनायक अशी ही मूर्ती आहे. रंगनाथ महाराजांनी लिंबाच्या झाडाखाली ही मूर्ती घडवली त्या लिंबाचा पाला आजही गोड असल्याचे पुजारी विनायक देशपांडे यांनी सांगितले. माळाचा गणपती संस्थान हे अतिशय प्राचीन असून नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे आपण इथे नेहमी येत असल्याचे विजय थोरात या भविकाने सांगितले.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
उंदराच्या कानात सांगितल्यानंतर पूर्ण होते इच्छा, नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल