कौटुंबिक सुख मिळतं -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असतो. या महिला दूरदर्शी आणि मैत्रीपूर्ण असतात. तसेच, त्या जीवनात लवकर यश मिळवतात. त्यांना कौटुंबिक सुख मिळते. त्याचबरोबर त्यांना समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. त्या खूप नाव आणि पैसा कमावतात.
कपाळाच्या मध्यभागी तीळ -
ज्या महिलांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो, त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांना वैवाहिक जीवनात पूर्ण आनंद मिळतो. मात्र, त्यांना किरकोळ आजार होत राहतात. शिवाय त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पण श्रीमंती पायाशी राहते. अशा स्त्रियांचे वय जसजसे वाढते तसतसे त्यांचे पैसेही वाढत जातात. परंतु, या महिला थोड्या उधळपट्टी करू शकतात.
advertisement
पौष महिन्याची संकष्टी चतुर्थी सोमवारी; अर्घ्य विधी-मंत्र, व्रताचं महत्त्व
भुवयांवर तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या भुवयांमध्ये तीळ असतो, त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांचे श्रीमंत कुटुंबात लग्न होतं, त्या सर्व भौतिक सुखसोयींचा आनंद घेतात. नेहमी राणीसारखे राज्य करतात. त्यांच्या हातातही भरपूर पैसा राहतो. ती नेहमी तिच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाते.
कपाळावर खालच्या बाजूला तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळाच्या खालच्या बाजूला तीळ असतो त्या खूप भावूक असतात. जीवनात यशस्वी होतात. त्यांना आई-वडिलांचे खूप प्रेम मिळते. आयुष्य श्रीमंतीत जगतात. शिवाय, त्या खूप वक्तशीर आणि कलेच्या प्रेमी आणि जाणकार असतात. पैसे वाचवण्यातही त्या निष्णात असतात.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
