Sankashti chaturthi 2024: पौष महिन्याची संकष्टी चतुर्थी सोमवारी? अर्घ्य विधी, मंत्र, व्रताचं धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sankashti chaturthi 2024 : पंचांगानुसार मराठी पौष महिन्याची चतुर्थी 29 जानेवारीला सकाळी 06.10 वाजता सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 30 जानेवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल. उदयतिथीला आधार मानून 29 जानेवारीलाच संकष्टी साजरी केली जाणार आहे.
मुंबई, 27 जानेवारी : संकष्टी चतुर्थीचा उपवास सोमवार, 29 जानेवारी रोजी आहे. अनेक ठिकाणी या संकष्टीला निर्जला व्रत करण्याची परंपरा आहे. जी व्यक्ती या दिवशी व्रत करून श्रीगणेशाची पूजा करते, त्याची सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. चतुर्थी व्रतामध्ये चंद्राची पूजा करणे बंधनकारक आहे. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी संकष्टीला चंद्राची पूजा का केली जाते. चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत काय आहे? चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याचा मंत्र इ. विषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.
पौष संकष्टी चतुर्थी 2024 तिथी
पंचांगानुसार मराठी पौष महिन्याची चतुर्थी 29 जानेवारीला सकाळी 06.10 वाजता सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 30 जानेवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल. उदयतिथीला आधार मानून 29 जानेवारीलाच संकष्टी साजरी केली जाणार आहे.
सकंष्टी चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त -
अमृत (सर्वोत्तम): सकाळी 07.12 ते सकाळी 08.32 पर्यंत
advertisement
शुभ (उत्तम): सकाळी 09.43 ते सकाळी 11.15 पर्यंत
संध्याकाळची वेळ: दुपारी 04.37 ते 07.36 पर्यंत
कोणते शुभ योग -
या संकष्टी व्रताच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये शुक्र, मंगळ आणि बुधपासून त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शोभन योगही तयार होत असून त्यामध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळतं.
advertisement
गणेश स्तोत्र -
शृणु पुत्र महाभाग योगशान्तिप्रदायकम् ।
येन त्वं सर्वयोगज्ञो ब्रह्मभूतो भविष्यसि ॥
चित्तं पञ्चविधं प्रोक्तं क्षिप्तं मूढं महामते ।
विक्षिप्तं च तथैकाग्रं निरोधं भूमिसज्ञकम् ॥
तत्र प्रकाशकर्ताऽसौ चिन्तामणिहृदि स्थितः ।
साक्षाद्योगेश योगेज्ञैर्लभ्यते भूमिनाशनात् ॥
चित्तरूपा स्वयंबुद्धिश्चित्तभ्रान्तिकरी मता ।
advertisement
सिद्धिर्माया गणेशस्य मायाखेलक उच्यते ॥
अतो गणेशमन्त्रेण गणेशं भज पुत्रक ।
तेन त्वं ब्रह्मभूतस्तं शन्तियोगमवापस्यसि ॥
इत्युक्त्वा गणराजस्य ददौ मन्त्रं तथारुणिः ।
एकाक्षरं स्वपुत्राय ध्यनादिभ्यः सुसंयुतम् ॥
तेन तं साधयति स्म गणेशं सर्वसिद्धिदम् ।
क्रमेण शान्तिमापन्नो योगिवन्द्योऽभवत्ततः ॥
संकष्टीला चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत -
संकष्टीच्या रात्री 09:30 वाजता (मुंबई) चंद्र उगवेल. चांदीच्या ग्लासात किंवा भांड्यात पाणी भरावे. नंतर त्यात कच्चे गाईचे दूध, अखंड पांढरी फुले घाला. त्यानंतर चंद्रदेवाचे स्मरण करून त्यांना अर्घ्य अर्पण करावे. तुमचे संकट दूर व्हावे आणि मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करावी.
advertisement
चंद्राला जल अर्पण करण्याचा मंत्र -
गगनर्णवमानिक्य चंद्र दक्षिणिपते ।
ग्रहणर्घ्यं माया दत्तं गणेशप्रतिरूपका ॥
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2024 8:50 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sankashti chaturthi 2024: पौष महिन्याची संकष्टी चतुर्थी सोमवारी? अर्घ्य विधी, मंत्र, व्रताचं धार्मिक महत्त्व


