कटिहार, 24 ऑक्टोबर : नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. देवीच्या भक्तीरसात भाविक लीन झाले आहेत. काही भाविक हे फक्त फळ खाऊन तर काही फक्त पाणी पिऊन 9 दिवस उपवास करत आहेत. त्यातच आता महिलेच्या अनोख्या भक्तीचे रुप समोर आले आहे.
advertisement
ही महिला बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रौतारा येथील रहिवासी आहे. आपल्या छातीवर या महिलेने देवीच्या कळसाची स्थापना केली आहे. याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, आई दुर्गा मातेच्या प्रती असलेली अमाप भक्ती आणि श्रद्धा यामुळे प्रेरित होऊन हे कार्य केले जात आहे.
घरासमोरच एका खोलीत दुर्गा मातेच्या फोटोसमोर छातीवर कळस स्थापन करत ही महिला लेटली आहे. नऊ दिवस तिने एक थेंबही अन्न किंवा पाणी घेतले नाही आणि अशाच अवस्थेत त्यांनी मातेची साधना केली.
महिलेचे नातेवाईक म्हणाले की, या कठीण तपस्यासाठी तब्बल 1 आठवडाआधी तयारी करावी लागली. भक्ति रूपा देवी असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे पती श्याम पासवान म्हणाले की, त्यांच्या पत्नीने दुर्गा मातेकडे एक मनोकामना व्यक्त केली होती. ती पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे त्यांच्या पत्नी दुर्गा मातेची साधना करत आहेत.
स्थानिक लोक म्हणाले की, याआधी आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक येत आहेत. या महिलेच्या भक्तीचे अनोखे रुप पाहून सर्वच जण आश्चर्यचकित होत आहेत.