वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे स्वामित्व वेगवेगळ्या देवतेकडे आहे. तसेच प्रत्येक दिशेचे प्रतीके , ग्रह ,तत्व आणि वेगवेगळे रंग सांगितले गेले आहेत. जर दिशा लक्षात न घेता वास्तूची रचना करण्यात आली, तर या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते व म्हणूनच वास्तूची रचना करताना आणि घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात घेणे अत्यंत गरजेचे असते.
advertisement
Yogiraj Shankar Maharaj : कोण होते शंकर महाराज? ज्यांना आवडायचा सिगारेटचा धूर
पूर्व दिशेचा स्वामी इंद्र तर पश्चिमेचा स्वामी वरूण, उत्तरेचा स्वामी कुबेर व दक्षिणेचा स्वामी यम आहेत
जाणून घेऊया दक्षिण दाराचे परिणाम
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेचा स्वामी यम असून या दिशेचा ग्रह मंगळ आहे जर आपल्या पत्रिकेनुसार मंगळ शुभफलदायी नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीच्या तक्रारी उदभवत असतात.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तरी अनेक चांगले परिणाम मिळतात.
ऊर्जा दोन प्रकारची असते - चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. अनेक वेळा लोकांच्या बोलण्यातून हे वाक्य ऐकायला येत असते काय अवदसा घरात आलीय बोलीभाषेतील ही अवदसा ( पिडा ) म्हणजेच निगेटीव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी , सुख , प्रगती होय. चांगल्या वैश्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हावं म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर पाँझिटीव्ह एनर्जी म्हणजे सुख-समृद्धी (लक्ष्मी) घरात येते. आपल्या घरात आयु, आरोग्य , कल्याण , मांगल्य, यश प्राप्ती होते, भाग्योदय होतो, असं वास्तुशास्त्र मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो.
या दक्षिण दारातून जेव्हा नकारात्मक उर्जा घरात आल्याची प्रचीती येते,तेव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घरात होवू लागतात. घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात सतत आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात , भांडणे, वादविवाद , घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडतात अशा घरातील जास्तीत जास्त पैसा शरीर बरे करण्यासाठी किंवा यंत्र दुरुस्तीसाठी होतो.
Eye Fluttering: डोळा फडफडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्याचे भविष्यात काय परिणाम होतात
घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचा चेहरा (मुख) आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचे आरोग्य बिघडवते. अगदी त्याचप्रमाणे दूषित व नकारात्मक उर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य बिघडवतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)