TRENDING:

Dasara Muhurat 2025: दसरा नेमका कधी? तिथी, मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती

Last Updated:

Dasara Muhurat 2025: यंदा दसरा साजरा करण्याबाबत 1 की 2 ऑक्टोबर असा संभ्रम आहे. दसरा कधी आणि कसा साजरा करावा? याबाबत गुरुजींनी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: विदयादशमी दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले. या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. तसेच देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला, म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी शस्त्र पूजनही केले जाते. यंदा दसरा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. याबाबत पुणे येथील शंकर पाटील गुरुजी यांनी माहिती दिलीये.
advertisement

तिथी आणि शुभ मुहूर्त

यावर्षी आश्विन शुक्ल दशमी 1 ऑक्टोबर सायंकाळी 7:01 वाजता सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर सायंकाळी 7:10 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार दसरा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

पूजेचा मुख्य मुहूर्त: दुपारी 2:09 ते 2:56

पूजेचा अतिरिक्त मुहूर्त: दुपारी 1:21 ते 3:44

रावण दहनासाठी सर्वात शुभ वेळ प्रदोषकाल मानला जातो. सूर्यास्त सायंकाळी 6:05 असल्याने, यानंतर रावण दहनाची सुरुवात करता येईल.

advertisement

Navratri 2025: नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा? घट विसर्जन कधी करायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

दसऱ्याचे महत्त्व काय?

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार असं मानलं जातं की, त्रेतायुगात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला रामानं रावणाला मारलं होतं. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याला रावण दहन करतात. रावणाच्या पुतळ्याला जाळून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. दशमी तिथी या गोष्टीचं प्रतीक आहे की अधर्मावर नेहमी धर्माचा विजय होतो.

advertisement

दसऱ्याच्या दिवशी कोणाची पूजा करावी?

दसऱ्याच्या दिवशी अस्त्र-शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. महिषासुरमर्दिनी माता दुर्गेची उपासना करून नवीन काम सुरू करणे लाभदायक ठरते. नवग्रहांचे संतुलन राखण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीरामाची पूजा देखील महत्त्वाची आहे, ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

पूजा झाल्यानंतर कलशातील पाणी घरभर पसरवावे, जे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. तसेच नवरात्रात देवीची पूजा केलेल्या ठिकाणी रात्रभर तुपाचा दिवा लावावा, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असे शंकर पाटील गुरुजी सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Dasara Muhurat 2025: दसरा नेमका कधी? तिथी, मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल