यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. छान आकर्षक साडीशिवाय गुढी पाडव्याची कल्पना करता येत नाही. गुढीकाठीला आकर्षक साडी बांधण्याची प्रत्येकाची इच्छा असते. घरात खूप साड्या असल्या तरी कोणती साडी गुढीसाठी वापरावी याविषयी मनात संभ्रम असल्यास आम्ही थोडे मार्गदर्शन करू शकतो. गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी शुभ ठरेल, छान वाटेल जाणून घेऊ.
advertisement
पिवळा रंग - पिवळा रंग हा चैतन्य, उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. हा रंग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाची साडी गुढीला नेसवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि बुद्धीमध्ये सात्त्विकता येते.
लाल किंवा गडद गुलाबी रंग - लाल रंग हा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. गुढीला लाल किंवा भरजरी गुलाबी रंगाची साडी नेसवणे अत्यंत शुभ असते. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. विशेषतः ज्यांना समृद्धी हवी आहे, त्यांनी या रंगाची निवड करावी.
केशरी किंवा भगवा रंग - केशरी रंग हा त्याग, ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. गुढीला केशरी रंगाची साडी नेसवल्याने घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो आणि कार्यामध्ये यश मिळते. हा रंग हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो.
जुळवा-जुळव फक्त निमित्त! आयुष्यात जोडीदार म्हणून 'तीच' व्यक्ती येण्याचं खरं कारण...
हिरवा रंग - हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि वाढीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसायात प्रगती हवी असेल किंवा घरात धनधान्याची भरभराट हवी असेल, तर हिरव्या रंगाची साडी किंवा शाल गुढीला नेसवावी. हा रंग डोळ्यांना शांतता देतो आणि घरात सुबत्ता आणतो.
जरीकाठाची साडी - रंग कोणताही असो, पण गुढीला नेसवली जाणारी साडी ही शक्यतो रेशमी आणि जरीकाठाची असावी. जरीचा काठ हा ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो.
गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवत नाहीत. कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो. शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा, वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता.
कोणाची शक्ती कशात? राशीनुसार माणूस कसा असतो? शरद उपाध्येंनी एका वाक्यात सांगितलं..
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 2026 -
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. पंचागतज्ज्ञांच्या मते 19 तारखेला सकाळी 6.53 वाजल्यानंतर गुढी उभारावी.
