सिद्धेश्वराच्या मंदिरात माउलींच्या आई आणि वडिलांची भेट होऊन त्यांचा विवाह या ठिकाणी झाला. विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणीदेवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजाण वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यानंतर ते गृहस्थाश्रमात आले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुलं झाली.
advertisement
हैबत बाबांचं पायरीपूजन अन् माऊलींच्या संजीवन सोहळ्यास प्रारंभ; पाहा शेकडो वर्षांची परंपरा
हरिहर भक्ती परंपरा
भगवान शंकर हे नाथ संप्रदायचे प्रमुख देवता मानले जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायचे तत्वज्ञान जेव्हा अंगीकारलं आणि त्यातून वारकरी संप्रदायला एक वेगळं तत्वज्ञान दिलं. ते म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजेच हरिहराची भक्ती दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एका विशिष्ट वर्षापर्यंत तुम्हाला आम्हा सर्व दिलं आणि नंतर त्यांचे गुरु संत निवृत्तीनाथ यांचे आज्ञेने आणि पांडुरंगाच्या कृपेनें समाधीचा निर्णय घेतला, असं योगी निरंजन महाराज सांगतात.
थायलंडमधील भक्ताचं 'दगडूशेठ'ला दान, पुणेकरांना होणार फायदा
सिद्धेश्वर मंदिरात समाधी का?
ज्ञानेश्वरांनी समाधीसाठी जागा निवडतांना आपल्या आराध्य दैवत असलेल्या मंदिराची निवड केली. शिवतत्व असलेल्या तसेच आराध्य दैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात त्यांनी समाधी घेतली. विष्णुरूपी ज्ञानेश्वरांना भगवान सिद्धेश्वरांनी समाधीसाठी हेच स्थान निवडावं असं सांगितलं असावं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतली, असं योगी निरंजन महाराज सांगतात.





