हैबत बाबांचं पायरीपूजन अन् माऊलींच्या संजीवन सोहळ्यास प्रारंभ; पाहा शेकडो वर्षांची परंपरा

Last Updated:

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून तीर्थक्षेत्र आळंदीत सुरुवात झालीय.

+
News18

News18

पुणे, 5 डिसेंबर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून तीर्थक्षेत्र आळंदीत सुरुवात झालीय. संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातील असंख्य वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. सकाळी माऊलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. मंदिराच्या सेवकांनी पायरी स्वच्छ केली. महाद्वारात पायरीपूजनासाठी भाविकांची गर्दी झाली.
यावेळी महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला वारकऱ्यांचा माऊली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. गुरु हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. परंतु हे हैबत बाबा नेमके कोण आणि त्यांच्या पायरीपूजनाने का होते संजीवन सोहळ्याला सुरुवात हे आपण जाणून घेऊया.
advertisement
कोण होते हैबतबाबा?
हैबतबाबा पवार उर्फ हैबतबाबा आरफळकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे. पण ते ग्वाल्हेर येथील शिंदे सरकार यांच्या सैन्यातील सरदार होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा होती. एकदा काय झालं तर त्यांची वारी ग्वाल्हेरहून आळंदीकडे येत असताना सातपुडा पर्वत भागात काही दरोडेखोरांनी त्यांना घेरलं. त्यावेळी त्या दरोडेखोरांनी हैबत बाबांच्या अनेक साथीदारांना ठार देखील केलं. मग त्यावेळी संकटात सापडलेल्या हैबतबाबांनी म्हणे ज्ञानेश्वर माऊलींचा धावा सुरु केला. त्यानंतर दरोडेखोरांच्या हातून सुटका झालेल्या हैबतबाबांना हा आपला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटू लागल. आपण फक्त माऊलीं मुळे वाचलो अशी त्याची धारणा झाली.
advertisement
तुळशीसंबंधी ‘हे’ करून पहा, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
त्यामुळे आता उरलेलं आयुष्य हे फक्त आणि फक्त माऊलीच्याच सेवेत घालवायचे या विचारातून एका धारकऱ्याचा वारकरी झाला. आणि पुढे आळंदी मध्येच ते स्थायिक झाले. जसं संतांनी आपलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर वाहिलेलं होतं नेमकं तसंच हैबतीबाबांनी देखील आपलं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणांवर अर्पण केलेलं होतं. त्यामुळंच पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणाजवळ जसं नामदेव पायरीचं महत्वय अगदी तसंच ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ हैबतबाबांच्या पायरीचं स्थान अबाधित आहे. त्यामुळे माऊलींच्या संजीवन सोहळ्याची सुरुवात हैबतबाबांच्या पायरी पूजनाने होते, अशी आख्यायिका मंदिराचे विश्वस्त योगी निरंजन महाराज यांनी सांगितली.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
हैबत बाबांचं पायरीपूजन अन् माऊलींच्या संजीवन सोहळ्यास प्रारंभ; पाहा शेकडो वर्षांची परंपरा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement