शिवलिंगावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी -
17 जानेवारी रोजी विराट रामायण मंदिर परिसरात शिवलिंगाची पीठ पूजा, हवन आणि विधीपूर्वक स्थापना केली जाईल. या विशेष पूजेत कैलास मानसरोवर, हरिद्वार, सोनपूर, प्रयागराज आणि गंगोत्री येथील पवित्र जलाचा जलाभिषेकासाठी वापर केला जाईल. याशिवाय हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
120 एकरमध्ये पसरलेला ड्रीम प्रोजेक्ट - पद्मश्री आचार्य किशोर कुणाल यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले विराट रामायण मंदिर 120 एकर परिसरात पसरलेले आहे. 2030 पर्यंत जेव्हा हे काम पूर्ण होईल, तेव्हा ते जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक ठरेल, ज्यामध्ये 18 मंदिरे आणि उंच मनोरे असतील. हे शिवलिंग मंदिराचे मुख्य आकर्षण असेल, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
याबाबत जिल्हाधिकारी सौरव जोरवाल यांनी सांगितले की, शिवलिंगाच्या आगमनानिमित्त विशेष तयारी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. पूर्व चंपारणच्या कथवलिया येथे विराट रामायण मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. तिथे शिवलिंग स्थापित केले जाईल, ज्यासाठी प्रशासकीय स्तरावरही जय्यत तयारी सुरू आहे.
विराट रामायण मंदिराची काही खास वैशिष्ट्ये -
जगातील सर्वात मोठे मंदिर- हे मंदिर पूर्ण झाल्यावर कंबोडियातील प्रसिद्ध 'अंकोरवाट' मंदिरापेक्षाही मोठे असेल. अंकोरवाट मंदिराची उंची 215 फूट आहे, तर विराट रामायण मंदिराची उंची 270 फूट असेल.
भव्य रचना - या मंदिराची लांबी 2800 फूट आणि रुंदी 1400 फूट आहे. मंदिरात एकूण 18 देवळे असतील, ज्यात प्रामुख्याने भगवान राम, माता सीता आणि भगवान शिव यांची मंदिरे असतील. येथे जगातील सर्वात मोठे शिवलिंग (सहस्त्रलिंगम) स्थापित केले जात आहे, ज्यावर एकाच वेळी 108 लहान शिवलिंगांची प्रतिकृती कोरलेली आहे. अष्टकोनी शिखर या मंदिराला 12 उंच शिखरे असतील, त्यापैकी मुख्य शिखर हे अतिशय भव्य आणि कलाकुसरीने नटलेले असेल. याची रचना दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय मंदिर स्थापत्यशैलीचा संगम असेल.
