RCB ने अखेर IPL ची पहिली ट्रॉफी जिंकली आणि शहरभर आनंदोत्सव सुरू झाला. लाखो लोक स्टेडियमच्या आजूबाजूला जमले होते. दिव्यांशीसाठी हा एक स्वप्नवत क्षण होता. विराट कोहलीला प्रत्यक्ष पाहण्याची तिची इच्छा होती. पण त्या प्रचंड गर्दीत ती आपल्या आई-वडिलांपासून दूर झाली… आणि नंतर परत दिसलीच नाही.
RCBच्या विक्ट्री परेडमध्ये कुठे चुक झाली? तयारी 2 लाखांची, आले 6 लाखाहून अधिक
advertisement
गेटवर गर्दीचा उद्रेक, दिव्यांशी हरवते
स्टेडियमबाहेर जवळपास 6 लाखांची गर्दी जमली होती, जिथे प्रशासनाने केवळ 2 लाखांची व्यवस्था केली होती. अनेक गेट्स असतानाही संपूर्ण गर्दी एका गेटवर तुटून पडली. काही लोक भिंती फोडून, काही सुरक्षा कुंपण ओलांडून आत शिरायचा प्रयत्न करत होते. याच गोंधळात भगदड उडाली आणि याच गर्दीत दिव्यांशी हरवली.
कोण CPR देतोय, कोण Ambulance नाही म्हणून उचलून पळतोय; चेंगराचेंगरीची भयावह घटना
रुग्णालय, पोलीस ठाणे, मोर्चरी… पण कुठेच दिव्यांशी नाही
दिवसभर तिचे पालक फक्त एकच प्रश्न घेऊन धावत होते – “तुम्ही माझी दिव्यांशी पाहिली आहे का?”
ते बॉवरिंग रुग्णालयात गेले, जिथे जखमींवर उपचार सुरू होते. नंतर विक्टोरिया हॉस्पिटल, पोलीस ठाणे, अगदी मोर्चरीपर्यंत… पण कुठेच दिव्यांशीचं काहीच ठावठिकाणा नाही. तिच्या आईने डोळ्यांत अश्रू घेऊन सांगितलं – ती खूप खुश होती. विराटला बघायचं स्वप्न होतं तिला. आता एकदाच ती सापडावी, इतकंच मागणं आहे देवाजवळ.
एक फोटो, जो आता...
दिव्यांशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हजारो लोक तिचा शोध घेत आहेत. पण वेळ निघून जातोय आणि आशा मंदावत चालली आहे. RCB चाहत्यांसाठी ही ट्रॉफी आणि हा दिवस कधीच विसरता येणार नाही. पण दिव्यांशीच्या पालकांसाठी हा दिवस बनलाय एक अधुरी, हृदयविदारक कहाणी.