भारतीय संघात रोहित शर्माची जागा घेईल असा धाकड खेळडू मिळाला आहे. हा खेळाडू अन्य कोणी नसून अभिषेक शर्माच आहे. विजय हजारे ट्रॉफीत पंजाब आणि सौराष्ट संघात झालेल्या राऊंड-5च्या लढतीत अभिषेक शर्माने फक्त 96 चेंडूत 170 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या आणि प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकाच्या जोरावर पंजाबने 5 बाद 424 धावांचा डोंगर उभा केला.
advertisement
हेडला अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणी धाडस करणार नाही;नवज्योतसिंग सिद्धू संतापले
अहमदाबादच्या गुजरात कॉलेज ग्राउंडवर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने 31 षटकात 298 धावा केल्या होत्या. कर्णधार अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने गोलंदाजांची बेदम धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाटी 298 धावांची भागिदारी केली. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे.
एका वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख! तुमच्याकडे आहे का या कंपनीचा शेअर?
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये पदार्पण केलेल्या अभिषेक शर्माने फक्त 96 चेंडूत 22 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 170 धावा ठोकल्या. शर्माचा जोडीदार प्रभसिमरनने 95 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 125 धावा केल्या. या दोन सलामीवीरांच्या स्फोटक फलंदाजीनंतर आलेल्या अनमोल मल्होत्राने 45 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 48 धावा केल्या. तर सनवीर सिंहने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 40 धावा केल्या.
अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहता भारताच्या वनडे आणि कसोटी संघात त्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे. शर्मा 19 वर्षाखालील 2018च्या वर्ल्डकपमध्ये शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ सोबत खेळला आहे. वर्ल्डकप संघातील गिल आणि शॉ यांनी याआधीच टीम इंडियाकडून पदार्पण केले आहे. या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर शर्माने टीम इंडियाकडून टी-20 मध्ये पदार्पण केले होते.
