Multibagger Stock: तुमच्याकडे आहे का या कंपनीचा शेअर? एका वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
मुंबई: शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. काहींची नजर ही अशा शेअर्सवरती असते ज्यामधून जास्त फायदा मिळेल. अशा आघाडीच्या कंपन्यांच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असते. पण काही शेअर्स हे छुप्या रुस्तम प्रमाणे असतात. अशाच एका शेअरने २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
एराया लाइफस्पेस लिमिडेट कंपनीने गेल्या वर्षभरात तब्बल १ हजार ५०० इतका रिटर्न दिला आहे. कंपनीने १०:१ प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा देखील केली आहे. याचा अर्थ १० रुपयाचे एका शेअरला १ रुपयाच्या १० शेअर्समध्ये बदलले जाईल. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली. जानेवारी २०२४ मध्ये एका शेअरची किंमत १२ रुपये होती ती डिसेंबर २०२४ मध्ये १ हजार १९४ इतकी झाली आहे. आता स्टॉक स्प्लिटनंतर किंमत २०० रुपयांच्या खाली आली आहे.
advertisement
PF साठी नव्या वर्षात नवे नियम, तुमचा काय फायदा होणार?
स्मॉलकॅप कंपनी असलेल्या एराया लाइफस्पेस लिमिडेट ही वेबसाइट, अॅप आणि अन्य डिजिटल प्लॉटफॉर्मच्या डिजिटल मार्केटिंगचे काम करते. कंपनीचे मार्केट व्हॅल्यूएशन २ हजार ५५१ कोटी इतके आहे. २०२४ मध्ये शेअरने गुंतवणूकदारांना १ हजार ५०० टक्के रिटर्न दिले आहेत. जर जानेवारी महिन्यात एखाद्या व्यक्तीने १ लाख रुपये गुंतवले असते तर वर्षाच्या शेवटी १६ लाख इतके झाले असते.
advertisement
३ जानेवारी २०२४ रोजी एराया लाइफस्पेस लिमिडेटच्या शेअर्सवर १ लाख रुपये गुंतवले असते तर १२ रुपयाच्या हिशोबाने ८ हजार ५०० शेअर मिळाले असते. वर्षाच्या शेवटी १ हजार १९४ रुपयाच्या हिशोबाने १६ लाख इतकी रक्कम झाली असती.
बोनस शेअर्स नव्हे लॉटरीच; कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला मिळतील चार!
डिसेंबरमध्ये कंपनीने शेअर्सची विभागणी केली. याचा अर्थ असा की १० रुपयाचा फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरला १ रुपायच्या फेसव्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये विभागण्यात आले. अशा प्रकारे शेअर स्प्लिट केल्यानंतर किंमत कमी होते. ज्यामुळे छोटे गुंतवणुकदार शेअर खरेदी करू शकतील. ज्यामुळे बाजारात शेअर्सची खरेदी विक्री वाढते.यामुळे शेअरधारकांच्या एकूण मुल्यावर काही परिणाम होत नाही. फक्त शेअर्सची संख्या वाढते.
advertisement
एराया लाइफस्पेस लिमिडेटने गेल्या दोन वर्षात १५ हजार ५९१ टक्के रिटर्न दिला आहे. कोणत्याही कंपनीपेक्षा ही कामगिरी जबरदस्त आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर १३४.९५ रुपयांवर बंद झाला. त्याआधी तो १३५.२० रुपयांवर बंद झाला होता. गेल्या ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळी ३१६.९० इतकी होती तर सर्वात कमी ११.९८ इतकी होती. अर्थात शेअर्सबाजारातील गुंतवणुक जोखमीची असते त्यामुळे गुंतवणुकीबाबतचा कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 29, 2024 8:01 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Multibagger Stock: तुमच्याकडे आहे का या कंपनीचा शेअर? एका वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख!


