अभिषेकचा नवा आयफोन
शुभमन गिलने अभिषेकचा फोन पाहिला अन् दोन्ही फोनमधील कॅमेऱ्यातील फरक चेक केला. कुणाचा फोन चांगला यावरून दोघांत पैज लागली होती. त्यावेळी दोन्ही खेळाडू उत्साहात असल्याचं दिसून आलं. अभिषेकचा नवा आयफोन शुभमन गिलला देखील आवडल्याचं दिसून आलं. अभिषेकने Apple iPhone 17 Pro Max घेतला की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
पाहा Video
थ्रोबॅक फोटो शेअर
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल आणि युवा बॅट्समन अभिषेक शर्मा यांच्यातील मैत्री क्रिकेट जगतात नेहमीच चर्चेचा विषय असते. हे दोघेही पंजाबकडून खेळतात आणि त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. नुकताच, अभिषेक शर्माने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिषेक शर्माने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गिलसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.
युवराजचे चेले देशाची शान
अभिषेक शर्माचा हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे किंवा त्यांनी एकत्र खेळायला सुरुवात केली तेव्हाचा असावा. या फोटोमध्ये ते दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अभिषेकने शुभमनला टॅग केले आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघेही पंजाब क्रिकेट टीममधून एकत्र खेळले आहेत.
