पहिली महिला क्रिकेटर ठरली
या अर्धशतकामुळे अमनजोत कौरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये नंबर 8 वर येऊन 50 पेक्षा जास्त रन्स करणारी ती भारतीय भूमीवरील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. याआधी पूजा वस्त्राकर यांनी 2022 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 67 रन्स केले होते, पण ती मॅच भारताबाहेर झाला होता. अमनजोत कौरसोबत दीप्ती शर्मानेही 53 रन्सची महत्त्वाची खेळी केली.
advertisement
अमनजोत आणि दीप्ति यांची शतकीय भागीदारी
एकेकाळी भारतीय टीम मोठी अडचणीत सापडली होती. स्मृती मंधाना 8 रन्सवर बाद झाल्यानंतर, 26व्या ओव्हरमध्ये हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या महत्त्वाच्या विकेट्स पडल्या. ऋचा घोषही फक्त 2 रन्स करून परतली. मात्र, यानंतर अमनजोत कौर आणि दीप्ति शर्मा यांनी शतकीय भागीदारी रचत संघाचा डाव सावरला आणि स्कोर 269 रन्सपर्यंत नेला.
कारपेंटर वडिलांनी बॅट बनवून दिली अन्...
मोहालीमध्ये 25 ऑगस्ट, 2000 रोजी जन्मलेल्या अमनजोतचे वडील भूपिंदर सिंग हे सुतार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनीच अमनजोतसाठी पहिली बॅट बनवून दिली होती. अमनजोत क्रिकेट खेळण्यास सुरुवात करत असताना तिचे वडील नाराज होते, पण तिच्या आजीने तिला पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या 15 वर्षांपर्यंत अमनजोत क्रिकेटसोबतच फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल हे खेळ मुलांसोबत खेळायची. त्यानंतर तिने एका ॲकॅडमीत प्रवेश घेतला, जिथे तिच्या बॅट स्विंगची पद्धत प्रशिक्षकांच्या नजरेत आली आणि तिचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.