अर्शदीप सिंगचा टेस्ट डेब्यू (Arshdeep Singh Test debut)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी मॅच गुरुवारी सुरू होईल. चौथ्या कसोटीमध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या अर्शदीप सिंग याला ओव्हर टेस्टमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. अर्शदीप सिंग याला वारंवार डावललं जात होतं. अशातच आता निर्णयक सामन्यात अर्शदीपला आपली किमया दाखवावी लागणार आहे. देशासाठी रेड बॉल क्रिकेट खेळणं हे कोणत्याही क्रिकेटपटूचं अंतिम स्वप्न असतं. अर्शदीपचंही असंच आहे, अर्शदीपचे बालपणीचे प्रशिक्षक जसवंत राय यांनी म्हटलं आहे.
advertisement
टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट
बॉल दोन्ही बाजूंना स्विंग करण्याचा त्याचा अविश्वसनीय कौशल्य आणि सातत्याने 6 मीटर लांबीवर बॉल टाकण्याची त्याची क्षमता पाहता, अर्शदीप सिंग हा झहीर खाननंतर भारताला मिळालेला सर्वोत्तम बॉलर्स आहे, असं म्हटलं जाऊ शकतं. अशातच आता कसोटी क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट अर्शदीप किती प्रभावी ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण, आकाश दीप, आकाश दीप, अरविंद, अरविंद, एन. जगदीसन (विकेटकीपर).