धावत गेला, लेकाला कडकडून मिठी; 300 चा स्ट्राईक रेट अन् Yusuf Pathan ने भारताला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये, पाहा Video

Last Updated:

Yusuf Pathan Viral Video : प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 144 धावा केल्या. त्यामुळे आता इंडिया चॅम्पियन्सना 145 धावांचे लक्ष्य 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचे होते.

Yusuf Pathan hug son in stadium
Yusuf Pathan hug son in stadium
India champions Into The Semis : वर्ल्ड चॅम्पियन्स लीग (WCL 2025) च्या सेमीफायनलमधील स्थानासाठी अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये इंडिया चॅम्पियन्ससमोर वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचे आव्हान होतं. वेस्ट इंडिज चॅम्पियन्ससाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचं होतं, तर इंडिया चॅम्पियन्सना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी त्यांनी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग केवळ 20 ओव्हरमध्ये नव्हे, तर 14.1 ओव्हरमध्येच पूर्ण करणं बंधनकारक होतं. या थरारक सामन्यात युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. युसूफ पठाणची वादळी खेळी यावेळी आकर्षक ठरली.

14.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं लक्ष्य 

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 144 धावा केल्या. त्यामुळे आता इंडिया चॅम्पियन्सना 145 धावांचे लक्ष्य 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचे होते. स्टुअर्ट बिन्नीने एक बाजू लावून धरली होती, पण तरीही सेमीफायनलचे तिकीट मिळवणे कठीण वाटत होतं.
advertisement

युसूफ पठाणची एन्ट्री

अशा स्थितीत, क्रीझवर युसूफ पठाणची एन्ट्री झाली आणि बघता बघता संपूर्ण सामना पालटला. एक खेळाडू जो संघाची आशा बनून आला होता आणि एक वडील, जो आपल्या मुलाला मैदानातून 'हिरो' बनून परत येण्याचे वचन देऊन आला होता. नेमकं तेच पाहायला मिळालं. वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्धच्या 'करो या मरो'च्या या मॅचमध्ये युसूफ पठाणने 300 च्या स्ट्राइक रेटने केवळ 7 बॉलमध्ये 2 सिक्स मारत नाबाद 21 धावा केल्या.
advertisement












View this post on Instagram























A post shared by FanCode (@fancode)



advertisement

युवराज- बिन्नीचं वादळ

टीम इंडियाकडून कॅप्टन युवराज सिंग याने 11 बॉलमध्ये 21 धावांची आक्रमक खेळी केली. तर स्टुअर्ड बिन्नी याने 21 बॉलमध्ये 50 धावा केल्या. तसेच युसुफ पठाणने अखेरीस 2 सिक्स आणि 1 फोर मारला अन् टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
advertisement

धावत लेकाकडे गेला अन्...

युसूफ पठाणने आपल्या छोट्या पण वादळी इनिंगद्वारे केवळ संघाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर आपल्या मुलाला दिलेले वचनही पूर्ण केले. कदाचित यामुळेच मॅचनंतर बाप-लेकाचे सेलिब्रेशनही मैदानात पाहायला मिळाले. युसुफच्या 21 धावांसह WCL 2025 मधील सेमीफायनलपूर्वी खेळलेल्या 4 मॅचमध्ये त्याच्या एकूण 130 धावा झाल्या आहेत, ज्यात 8 सिक्स आणि 11 फोरचा समावेश आहे. युसूफ पठाण WCL 2025 मध्ये शिखर धवननंतर इंडिया चॅम्पियन्सचा दुसरा सर्वात यशस्वी बॅट्समन आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
धावत गेला, लेकाला कडकडून मिठी; 300 चा स्ट्राईक रेट अन् Yusuf Pathan ने भारताला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये, पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement