advertisement

Phaltan Doctor Case: मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचिट पण धनंजय मुंडेंचा रोख माजी खासदार निंबाळकरांकडे, PA चे महिला डॉक्टरला दबावाचे फोन यायचे!

Last Updated:

पीडित मृत डॉक्टर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी थेटपणे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाईक निंबाळकरांना क्लिनचिट दिलेली असतानाही गंभीर आरोप करून मुंडे यांनी आगामी काळातील इरादे स्पष्ट केले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर-धनंजय मुंडे-देवेंद्र फडणवीस
रणजितसिंह नाईक निंबाळकर-धनंजय मुंडे-देवेंद्र फडणवीस
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लिनचिट देताना या प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नाही, असे जाहीरपणे सांगून त्यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे सातारकरांना दाखवून दिले. दुसरीकडे पीडित मृत डॉक्टर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी थेटपणे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर आरोप केले. मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यासाठी अनेक वेळा खासदारांचे स्वीय सहाय्यक फोन करायचे, असे सांगून त्यांची विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने मानसिक छळ आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून आपले जीवन संपवले. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र डॉक्टर महिलेने लिहिलेल्या पत्रात माजी खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप केले. आरोपी रुग्णांचे तंदुरुस्ती अहवाल बदण्यासाठी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाचे वारंवार फोन यायचे, असे मृत डॉक्टरने पत्रात लिहिले होते. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी साताऱ्याच्या माजी खासदारांचे नाव न घेता त्यांच्याकडून ऊस कामगार आणि मुकादम यांची होणारी पिळवणूक आणि या प्रकरणात महिला डॉक्टरवर वारंवार असलेला दबाव हा मुद्दा अधोरेखित केला.
advertisement

मुकादमाला मारहाण, नंतर रुग्णालयात दाखल न करून घेता तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी डॉक्टरवर दबाव

गरकळ नावाचे मुकादम आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर माजी खासदारांच्या कारखान्यावर आहेत. त्यांची काही बाकी शिल्लक होती. यावरून काहीसा वाद झाल्याने गरकळ यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना काहीही झाले नाही, ते पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहेत, यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला. खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने महिला डॉक्टरला अनेक वेळा फोन केले, असे सांगत संबंधित गरकळ नावाच्या मुकादमांना धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर आणले. ऊसतोड मुकादमाला समोर आणून मुंडेंनी सातारा जिल्ह्यात असलेल्या कारखान्याकडून होणारी पिळवणूक समोर आणली.
advertisement

शासनाला स्वस्थ बसू देणार नाही

ज्या खासदाराचा साखर कारखाना आहे, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने डॉक्टरवर दबाव टाकला. आता मी शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, मी मृत डॉक्टरला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्याची बदनामी काही पुढाऱ्यांनी केली

मागच्या प्रकरणात बीड जिल्ह्याची बदनामी जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांनी केली. आपलेही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात पोटापाण्यासाठी काम करतात या गोष्टी कदाचित त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. मृत डॉक्टरला तू बीडची आहेस, तुमच्या बीडमधील लोक कसे गुन्हेगार असतात, यावरून तिला त्रास देण्यात आला. आज त्या पुढाऱ्यांनी विचार करावा, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सुरेश धस, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Phaltan Doctor Case: मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचिट पण धनंजय मुंडेंचा रोख माजी खासदार निंबाळकरांकडे, PA चे महिला डॉक्टरला दबावाचे फोन यायचे!
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement