भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार असल्याचं अक्रम म्हणाला आहे. तसंच भारत-पाकिस्तान सामन्यातून चांगलं मनोरंजन झालं पाहिजे, असं वक्तव्यही अक्रमने केलं आहे.
भारतीय देशभक्त असतील तर...
'आधी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांप्रमाणेच ही मॅचही तितकीच रोमांचक असेल, असा मला विश्वास आहे. दोन्ही देशांचे खेळाडू आणि चाहत्यांनी स्वत:च्या मर्यादेत राहिलं पाहिजे, अशी अपेक्षा मला आहे. जर भारतीय देशभक्त असतील तर ते त्यांच्या टीमच्या विजयासाठी प्रार्थना करतील, हीच गोष्ट पाकिस्तानलाही लागू होते. मागच्या काही दिवसांमधला टीम इंडियाचा फॉर्म उत्कृष्ट आहे, त्यामुळे ते विजयाचे दावेदार असतील. पण मॅचच्या दिवशी जी टीम चांगल्या पद्धतीने दबावाचा सामना करेल, ती टीम जिंकेल', असं अक्रम म्हणाला आहे.
advertisement
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 3 सामने होण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरला दोन्ही टीम ग्रुप स्टेजमध्ये आमने-सामने असतील. यानंतर सुपर-4मध्येही दोन्ही टीमची टक्कर होईल, तसंच दोन्ही टीम फायनलमध्ये पोहोचल्या तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना होईल. वसीम अक्रमने भविष्यात भारत-पाकिस्तान यांच्यात टेस्ट सीरिजही खेळवली जावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पण भारत सरकारच्या नव्या धोरणामुळे हे सध्या तरी शक्य होणार नाही. भारत सरकारच्या धोरणानुसार दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सीरिज होणार नाही, फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच या दोन्ही टीम एकमेकांविरोधात खेळतील.
आशिया कपच्या इतिहासामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 18 सामने झाले आहेत, ज्यात भारताने 10 आणि पाकिस्तानने 6 विजय मिळवले आहेत, तर दोन मॅचचा निकाल लागू शकला नाही.