कसा घडला रुद्राक्ष?
रुद्राक्ष हा ठाणेकर असून त्याची आई हेमांगिनी पाटील आरटीओ अधिकारी तर वडील बाळासाहेब पाटील हे पालघर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त आहेत. अजित पाटील हे त्याचे प्रशिक्षक आहेत. मूळचे कोल्हापूरचे असणारे अजित पाटील हे रुद्राक्षला ठाण्यातील कोपरी प्रभागात असलेल्या पीपल्स एज्युकेशन स्कूल येथील शूटिंग रेंज मध्ये प्रशिक्षण देतात.
ठाण्याच्या रुद्राक्षचा एशियन गेम्समध्ये सुवर्णवेध, भारतीय संघाचं ऑलिम्पिक तिकिटही निश्चित
advertisement
मुंबईतल्या किर्ती कॉलेजमध्ये बीए फर्स्ट इयरला असलेला रुद्राक्ष पंधराव्या वर्षांपासून नियमित शूटिंगचा सराव करतोय. आज त्याला गोल्ड मेडल मिळाल्याचा खूप अभिमान वाटतो, अशी भावना प्रशिक्षक अजित पाटील यांनी व्यक्त केली.
रुद्राक्ष 2015-16 पासून रोज सराव करतोय. आई-बाबा म्हणून त्याला जी मदत हवीय ती आम्ही दिली. तो त्याच्या ध्येयापासून दूर होणार नाही याची खबरदारी घेतली. त्याच्या या यशात त्याची टीम, कोच, फिजिओ आणि मानसपोचार तज्ज्ञांचा मोठा वाटा आहे. आज त्यानं देशासाठी मेडल जिंकल्याचा मोठा अभिमान वाटतोय, अशी भावना रुद्राक्षचे वडील बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलीय.
चीनचा रेकॉर्ड मोडला
रुद्राक्षनं ऐश्वर्य प्रताप सिंग आणि दिव्यांश सिंग पानवार यांच्यासोबत सुवर्णपदकावर नाव कोरलं. रुद्राक्ष पाटील आणि संघाने केलेल्या या कामगिरीमुळे पॅरीसमध्ये 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे स्थान पक्के केले आहे. या तिघांनी वैयक्तिक क्वालिफिकेशन राउंडमध्ये 1893.7 पॉईंट्स मिळवले. यासोबतच तिघांनी बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेला याआधीचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला.