ऑस्ट्रेलियाची लेस्बियन क्रिकेटपटू अॅशले गार्डनर हिने आज न्यूझीलंडविरुद्ध 83 चेंडूत 115 धावा केल्या.या तिच्या धावांमुळे ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी हा सामना जिंकला आहे. आता भारत लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्धही सामना खेळणार आहे. त्यामुळे भारताला गार्डनरपासून सावध राहावे लागेल.
अॅशले गार्डनरने या वर्षी तिची दीर्घकाळची मैत्रीण मोनिका राईटशी लग्न केले. गार्डनरने एप्रिल २०२४ मध्ये राईटशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली.महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी स्थानावरून शतक झळकावणारी अॅशले गार्डनर पहिली फलंदाज ठरली आहे. यापूर्वी, हा विक्रम अॅलेक्स ब्लॅकवेलच्या नावावर होता, ज्याने 2017 मध्ये डर्बी येथे भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 90 धावा केल्या होत्या.
advertisement
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरने बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या 326 धावांच्या डावात 115 धावांच्या शतकासह महत्त्वाची भूमिका बजावली.गार्डनरने तिच्या डावात 83 चेंडूंचा सामना केला, त्यात 16 चौकार आणि एक षटकार मारला. फोबी लिचफिल्डने 45 धावा, किम गार्थने 38 धावा आणि एलिस पेरीने 33 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून जेस केर आणि ली ताहुहू यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर ब्री एलिंग आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
गार्डनरने संघाला वाचवले ऑस्ट्रेलियाने 4 बाद 113 धावा केल्या असताना गार्डनर 19 व्या षटकात मैदानावर आली. तिने फक्त 77 चेंडूत तिचे दुसरे एकदिवसीय शतक ठोकले आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.त्यानंतर गार्डनर अखेर 47 व्या षटकात बाद झाली, पण तोपर्यंत तिने तिचा सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या आधीच गाठली होती आणि ऑस्ट्रेलियन संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडला होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया 326 धावांवर ऑल आऊट झाली होती.
या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची कर्णधार साफिया डेव्हाईनने शतक झळकावले. तिने 112 चेंडूत 112 धावा केल्या. तथापि, तिला उर्वरित संघाकडून फारसे योगदान मिळाले नाही. न्यूझीलंड महिला संघाच्या दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाल्या. संघाच्या चार खेळाडूंना त्यांचे खातेही उघडता आले नाही.त्यामुळे न्युझीलंड 237 धावांवर ऑल आऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी हा सामना जिंकला.