आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपमध्ये आज ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान विरूद्ध सामना सूरू आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाचे एकामागून एक खेळाडू आऊट केले होते.त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 76 धावांवर 7 विकेट अशी झाली होती. अशा परिस्थितीत एक तर ऑस्ट्रेलियाचा संघ 100 किंवा 150 धावात ऑल आऊट होऊ शकला असता.
पण अशा कठिण परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा बेथ मुनी लेडी मॅक्सवेल बनून संघासाठी धावून आली.तिने एका बाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरून टीचून फलंदाजी केली.बेथ मूनीने एकाकी झूंज देत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.विशेष म्हणजे नुसती धुलाई केली नाही तर मोक्याच्या क्षणी 109 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत तिने 9 खणखणीत चौकार लगावले आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राईक रेट 90.91 होता.
advertisement
बेथ मूनीला यावेळी अलाना किंगने चांगली साथ दिली होती. अलाना किंगने 51 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत तिने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले आहेत.या दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानकडून डायना नशरा सिंधूने 3,रमीन शमीम आणि फातिमा सनाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. तर सादिक इकबाल आणि डायना बैगने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 धावा केल्यामुळे आता पाकिस्तानसमोर 222 धावांचे लक्ष्य आहे.