गेल्याच आठवड्यात जाहीर झालेल्या आशिया कप संघात गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तर अय्यरला वगळण्यात आल्यानंतर क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान एका आघाडीच्या हिंदी दैनिकाने असा दावा केला होता की मुंबईचा फलंदाज अय्यर याच्यावर मोठ्या योजना असून त्याला रोहित शर्मा यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
advertisement
मात्र BCCI सचिव देवजित सैकिया यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना ते म्हणाले, हे माझ्यासाठी नवीन आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत.
या वृत्तात असेही नमूद करण्यात आले आहे की निवड समितीच्या बैठकीतील घडामोडींशी संबंधित इतर अधिकाऱ्यांनीही अय्यरला भविष्यात कर्णधार बनविण्याच्या बातमीचा इन्कार केला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, गिलचा ODI सरासरी 59 आहे आणि तो आधीच संघाचा उपकर्णधार आहे. ज्याला नुकतेच कसोटी कर्णधारपद मिळाले आहे. काही प्रमाणात यशही मिळवले आहे आणि ज्याच्याकडे वयाचा मोठा फायदा आहे. त्याने योग्य वेळी एकदिवसीय नेतृत्व स्वीकारले नाही तर ते शक्यच नाही.
आता नजर ऑस्ट्रेलिया दौर्यावर
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. ते ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पांढर्या चेंडूच्या दौर्यात पुन्हा मैदानात उतरण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या भविष्यासंदर्भातील निर्णय हा निवडकर्ते त्यांच्या शारीरिक व मानसिक तयारीबाबत थेट चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे वृत्तांमधून समजते.
हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, निवड समितीला असा आत्मविश्वास नाही की रोहित यांची फॉर्म आणि फिटनेस पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2027) टिकून राहील.गिलच्या T20I कर्णधारपदाच्या भविष्यासाठी त्याने भारताच्या नव्या आक्रमक खेळशैलीशी तात्काळ जुळवून घेणे गरजेचे आहे. तर विश्वचषकापर्यंत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे.