खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून स्विगचा बादशाह आणि टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज भूवनेश्वर कुमार आहे. भुवनेश्वर कुमार हा 2023 भारतीय संघातून एकाकी गायब झाला होता.त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो आपलं नशीब आजमावत होता. पण आता एका टी20 लीगमध्ये तो प्रचंड चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.
advertisement
भूवनेश्वर कुमार सध्या युपी टी20 लीगमध्ये लखनऊ फॅल्कन संघाकडुन खेळतो आहे. या संघातून खेळताना त्याने गौर गोरखपूर लायन्सविरूद्ध खतरनाक गोलंदाजी केली आहे.भूवनेश्वरने गोरखपूरचा सलामीवीर आर्यन जुयालला सातत्याने त्याच्या आउटस्विंगने त्रास दिला.यावेळी भुवनेश्वर कुमारने फलंदाजाच्या आत आणि बाहेर चेंडू घेण्याची त्याची विंटेज क्षमता दाखवली, ज्यामुळे जुयाल अडचणीत आला होता. या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा दिल्या, ज्यामध्ये फक्त एक चौकार होता.
दरम्यान लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या 182 धावांच्या लक्ष्याचे रक्षण करण्यात मात्र हा वेगवान गोलंदाज आपल्या संघाला मदत करू शकला नाही. बावीस वर्षीय सिद्धार्थ यादवने फाल्कन्सच्या फिरकी गोलंदाजांना चिरडून टाकले आणि केवळ 45 चेंडूत 88* धावा फटकावत लायन्ससाठी रोमांचक विजय मिळवला.
सामन्याच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 22धावांची आवश्यकता असताना, यादवने लायन्सचा विजय निश्चित करण्यासाठी 3 षटकार आणि एक चौकार लगावला.
2025च्या आयपीएलमध्ये त्याने 17 विकेट्स घेतल्या असूनही, भुवनेश्वर कुमार भारतीय व्हाईट-बॉल संघासाठी कुठेही शर्यतीत नाही. या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना 2022 मध्ये पार्ल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याचा शेवटचा टी20 सामना 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळला होता. पण सध्या त्याची गोलंदाजी पाहून त्याला आशिया कपसारख्या स्पर्धेत खेळायला संधी मिळायला हवी होती, असे नेहमीच वाटते.