दक्षिण आफ्रिकेचं आव्हान पार करताना नामिबियाला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 23 रनची गरज होती, यानंतर त्यांनी 19व्या ओव्हरला 12 तर 20व्या ओव्हरमध्ये 14 रन करून थरारक विजय मिळवला. नामिबियाकडून झेन ग्रीनने 23 बॉलमध्ये नाबाद 30 रनची खेळी केली, तर रुबेन ट्रम्पलमेन 8 बॉलमध्ये 11 रनवर नाबाद राहिला. कर्णधार गेरहार्ड इरासमसने 21 रनची महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर, ऍन्डिले साईमलेन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. तर गेराल्ड कोटझी आणि फोर्टुइनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना सुरूवातीपासूनच धक्के बसायला सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतलेला क्विंटन डिकॉक फक्त 1 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या जे स्मिथने सर्वाधिक 30 रन केले, तर ओपनर लुहान ड्रे प्रिटोरियसने 22, रुबिन हेरमॅनने 23 रनची खेळी केली. नामिबियाकडून ट्रम्पलमेनने 3 विकेट घेतल्या, तर मॅक्स हेइंगोला 2 विकेट मिळाल्या. इरासमस, शिकोंगो आणि स्मिटला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.