नेमका वाद सुरू कुठं झाला?
नितीश राणा फलंदाजीसाठी तयार होता, तर दिग्वेशच्या हातात चेंडू होता. दिग्वेशने बॉल टाकण्याची योजना आखताना आपला प्लॅन बदलला. त्यामुळे नितीश राणा याला राग आहे. त्यानंतर नितीश राणाने देखील दिग्वेशला धडा शिकवला आणि चांगलंच धुवून काढलं. परिणामी दोन्ही खेळाडू मैदानाच्या मध्यभागी जोरदार भिडल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर खेळाडूंनी आणि महिला पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, थोड्या वेळाने इतर खेळाडूंमध्ये वाद पेटल्याचं पहायला मिळालं.
advertisement
पाहा Video
243 च्या स्ट्राईक रेटने धुलाई
दरम्यान, नीतीश राणा याने 55 बॉलचा सामना केला. दरम्यान, त्याने 243 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 134 धावा केल्या. ज्यामुळे पश्चिम दिल्ली संघ 17 बॉल शिल्लक असताना 7 विकेटने विजय मिळवू शकला.तर दिग्वेश राठीने वेस्ट दिल्ली लायन्सविरुद्ध खूप धावा दिल्या. त्याने 2 ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या. त्यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.