आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघात क्वालिफायर 2 सामन्याला सुरूवात झाली आहे. टॉस पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीला उतरली आहे. जसा टॉस झालं तसा फॅन्टसी ऍपवर लोकांनी टीम लावल्या आहे. काही जणांनी तर १० -१० टीम लावल्या आहेत. तर अनेकांनी तर हेड टू हेडमध्ये कमी जास्त पैसे देऊन टीम लावल्या आहे. पण पावसाने सगळ्या भावी करोडपतींचा जीव टांगणीला लागला आहे. जर मॅच झाली नाहीतर काय होईल, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
फॅन्टसी ऍपवर पैसे कसे येतील परत?
मुळात, ड्रीम ११, मायसर्कल ११ सह इतर अनेक असे ऍप आहे, ज्यामध्ये एक सारखेच फिचर्स आहे. फक्त मेगा लिग आणि हेड टू हेडमध्ये कमी जास्त पैसे लावून अनेक जण टीम लावतात. जेव्हा पावसाचा व्यत्यय येतो, तोपर्यंत मॅच कधी सुरू होणार हे तोपर्यंत वाट पाहिली जाते. आणि जर पावसामुळे मॅच रद्द झाली तर जितक्या टीम लावल्या आहे, त्याचे पैसे हे अकाउंटला परत येतात.
पावसामुळे आजचा सामनाच झाला नाही तर काय?
या सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनलध्ये पोहोचणार आहे. पण हा संघ कोण असणार आहे? हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. पण जर पावसामुळे आजचा सामनाच झाला नाही तर काय? जर अशी परिस्थिती आली तर मुंबई इंडियन्सला स्पर्धेतून बाहेर पडू शकते. पण मुंबईचं का पंजाब का नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत थेट फायनलमध्ये धडक दिली होती.तर पराभूत झालेल्या पंजाब किंग्जला क्वालिफायर 2 खेळावा लागणार होता. पण त्याआधी एलिमिनेटरचा सामना पार पडला.या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचली आहे.
आता पावसाने आजच्या सामन्यात खोडा घातला तर मोठा गेम होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लीग स्टेज तसंच क्वालिफायर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नसतो. आयपीएल फायनलसाठीच राखीव दिवस असतो, त्यामुळे क्वालिफायर-2 चा सामना पाऊस किंवा अन्य कारणांमुळे रद्द झाला तर लीग स्टेजमध्ये वरच्या क्रमांकाची टीम फायनलमध्ये प्रवेश करते. या नियमामुळे रविवारचा सामना पावसामुळे रद्द झाला तर पंजाब किंग्स फायनलमध्ये प्रवेश करेल. पंजाब किंग्सचे लीग स्टेजनंतर 19 पॉईंट्सस होते, तर मुंबईच्या खात्यात 16 पॉईंट्स होते, त्यामुळे आयपीएल फायनल पंजाब आणि आरसीबीमध्ये होईल.