TRENDING:

बँकेत ३९ रुपये होते, तेच ड्रीम ११ ला लावले, शेतकऱ्याच्या पोराने ४ कोटी जिंकले, गावात जल्लोष

Last Updated:

Dream11 Winner: मंगल सरोजने मार्च महिन्यापासून ड्रीम ११ खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत ७७ वेळा ड्रीम ११ खेळावर पैसे लावले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: कौशांबी जिल्ह्यातील घासी राम पूर्वा गावातील सुखलाल सरोज या शेतकऱ्याच्या मंगल सरोज नामक मुलाने ४ कोटी जिंकले आहेत. आयपीएलच्या पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात त्याने ड्रीम ११ मध्ये ४ कोटी रुपये जिंकून इतिहास रचला आहे. शेतकऱ्याचा पोरगा करोडपती झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. गावातील लोक मंगल सरोजची भेट घेऊन त्याचे अभिनंदन करीत आहेत.
शेतकऱ्याच्या पोराने ४ कोटी जिंकले
शेतकऱ्याच्या पोराने ४ कोटी जिंकले
advertisement

बँकेत ३९ रुपये होते, तेच ड्रीम ११ ला लावले

मंगल सरोजने मार्च महिन्यापासून ड्रीम ११ खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत ७७ वेळा ड्रीम ११ खेळावर पैसे लावले.२९ एप्रिल रोजी, ७८ व्या वेळी, त्याने ३९ रुपये गुंतवून ड्रीम ११ वर खेळ खेळला. विशेष म्हणजे त्याच्या बँक खात्यात तेवढेच पैसे शिल्लक राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून तो ड्रीम ११ वर एक कोटी रुपये जिंकण्याचे तो स्वप्न पाहत होता. दरम्यान, मंगल सरोजचे स्वप्न सत्यात उतरले.

advertisement

शेतकरी बापाचा लेक करोडपती झाला

मंगल सरोज याचे वडील सुखलाल सरोज हे शेतकरी आहेत. ते दुसऱ्यांच्या शेतीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतात जे काही पीक घेतले जाते, त्यातील एक तृतीयांश ते शेतमालकाला देतात आणि उरलेले कुटुंबासाठी ठेवतात.

मंगल प्रसाद सरोज म्हणाला- २ महिन्यांपासून पैसे लावायचो पण रोज हरायचो....

मार्चपासून सतत ४९ रुपये गुंतवून ड्रीम ११ वर खेळ खेळत होतो. प्रत्येक सामना हरलो. पण ३० एप्रिल रोजी जेव्हा चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना सुरू होता, तेव्हा खात्यात फक्त ३९ रुपये होते. मी हार मानली नाही, करोडपती होण्यासाठी मी रात्रंदिवस विचार करायचो. अखेर मला यश मिळाले. चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात ३९ रुपये गुंतवून ४ कोटी रुपये जिंकले. जिंकलेले पैसे एखाद्या चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार आहे, जेणेकरून भविष्य सुरक्षित होईल, असे मंगल प्रसाद सरोजने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बँकेत ३९ रुपये होते, तेच ड्रीम ११ ला लावले, शेतकऱ्याच्या पोराने ४ कोटी जिंकले, गावात जल्लोष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल