ऋतुराज गायकवाडने 206 बॉलमध्ये 184 रनची खेळी केली, यात त्याने 25 फोर आणि एक सिक्स लगावली. टीम इंडियाकडून बराच काळ बाहेर असलेल्या फास्ट बॉलरने वेस्ट झोनच्या बॅटिंगची कंबरच तोडली. ओपनर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर याला त्याने स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मॅचच्या पहिल्याच ओव्हरला डावखुरा फास्ट बॉलर खलील अहमद याने यशस्वी जयस्वालला आऊट केल. 3 बॉलमध्ये फक्त 4 रन करून जयस्वाल माघारी परतला. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये जयस्वालने तब्बल 411 रन केले होते, त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या जयस्वाललाच खलीलने आऊट केलं. यानंतर खलील अहमदने श्रेयस अय्यरला बोल्ड केलं. श्रेयस अय्यरने 28 बॉलमध्ये 25 रनची खेळी केली होती. या सामन्यात खलीलने त्याच्या स्विंग बॉलिंगने श्रेयस अय्यरसमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. खलील अहमदने 12 ओव्हरमध्ये 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या.
advertisement
खलील अहमदने भारताकडून शेवटची टी-20 मॅच 30 जुलै 2024 ला श्रीलंकेविरुद्ध खेळली, तर भारताकडून तो शेवटची वनडे 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. आयपीएलच्या या मोसमात खलील अहमद सीएसकेकडून खेळला. दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये खलीलने भेदक बॉलिंग केली आहे, याचसोबत त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठीचा दरवाजाही ठोठावला आहे.