TRENDING:

23 शतकं ठोकणाऱ्या भारताच्या क्रिकेटपटूला अटक, दारु पिऊन लग्जरी कारने उडवली अनेक वाहने; 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' केस

Last Updated:

Former India Cricketer Arrested: वडोदऱ्यात माजी भारतीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नशेच्या अवस्थेत त्यांच्या कारने अनेक वाहनांना धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वडोदा: गुजरातमधील वडोदऱ्यात भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी अकोटा पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोटा दांडिया बाजार ब्रिजवर मार्टिन एमजी हेक्टर कार चालवत होते. नशेच्या अवस्थेत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला.
News18
News18
advertisement

घटनेची माहिती मिळताच अकोटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान ही घटना ड्रिंक अँड ड्राईव्हची असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

जीवघेण्या अपघातातून वाचले 

सुमारे सात वर्षांपूर्वी वडोदऱ्यात झालेल्या एका गंभीर अपघातात जेकब मार्टिन यांच्या यकृत आणि फुफ्फुसांना गंभीर इजा झाली होती. त्या काळात उपचारासाठी कुटुंबाकडे पुरेसा निधी उरलेला नव्हता. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर बीसीसीआय, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.

advertisement

90 च्या दशकातील प्रभावी ऑलराउंडर

जेकब मार्टिन हे भारतीय क्रिकेटमधील एक परिचित नाव राहिले आहेत. त्यांनी भारताकडून 10 एकदिवसीय (ODI) सामने खेळले असले, तरी त्यांची खरी ओळख फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे निर्माण झाली. मार्टिन यांनी आपल्या कारकिर्दीत 138 फर्स्ट क्लास सामन्यांत 9,192 धावा केल्या असून, त्यामध्ये 23 दमदार शतकांचा समावेश आहे. प्रभावी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय 69 लिस्ट-ए सामन्यांत त्यांनी 2,217 धावा केल्या आहेत.

advertisement

जेकब मार्टिन हे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांनी भारताकडून 1999 ते 2001 या कालावधीत 10 एकदिवसीय सामने खेळले असून, त्यांची सरासरी 22.57 अशी होती. 1999 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतासाठी पदार्पण केले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली वडोदरा संघाने 2000-01 हंगामात रणजी ट्रॉफी जिंकली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी बडोदा आणि रेल्वे संघांचे प्रतिनिधित्व केले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
23 शतकं ठोकणाऱ्या भारताच्या क्रिकेटपटूला अटक, दारु पिऊन लग्जरी कारने उडवली अनेक वाहने; 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' केस
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल