काही महिन्यांपूर्वी सेहवाग आणि आरती यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे वृत्त आलं होतं. तसंच वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं गेलं.
मनहास-सेहवाग जुने मित्र
मिथुन मनहास आणि वीरेंद्र सेहवाग हे जुने मित्र आहेत, पण आता मनहास बीसीसीआय अध्यक्ष बनल्यानंतर त्याचे आणि आरती अहलावत याचे संबंध जोडले जात आहे. 2025 मध्ये रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मिथुन मनहास याने बीसीसीआय अध्यक्षपद स्वीकारले. पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, तेव्हापासून या चर्चांना वेग आला. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी 2009 मध्ये क्रिकेटपटू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्यातील वादाचा उल्लेख केला. अभिषेकची पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले.
advertisement
जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल
वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांची दोन्ही मुलं सोशल मीडियावर मिथुन मनहासला फॉलो करतात, हे चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर या अफवांना आणखी वेग आला. एवढच नाही तर 2021 मधील आरती आणि मिथुन मनहास यांचा एकत्र फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचा संशय आणखी वाढला. वीरेंद्र सेहवाग, आरती किंवा मिथुन मनहास यांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.