रोहित शर्मा संघात असायला नको
सौगत रॉय म्हणाले, मी ऐकले आहे की, रोहित शर्माची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यांनी एक शतक झळकावले आहे, पण त्याशिवाय ते दोन-तीन धावा काढून बाद होतात. त्याने संघात असू नये. भारत विजय मिळवत आहे, कारण इतर खेळाडू चांगले खेळत आहेत, पण कर्णधाराचा फारसा हातभार लागत नाही.
advertisement
पाक क्रिकेटपटूने Live शोमध्ये अब्रू घालवली; भीक मागून मिळाले नाही, म्हणून...
शमा मोहम्मद यांनी काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या वजनावर भाष्य करत खेळाडू म्हणून तो लठ्ठ आहे, त्याने वजन कमी करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. तसेच, “तो (रोहित) भारताचा आतापर्यंतचे सर्वांत कमकुवत कर्णधार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती.
VIP ग्रुपचा मेंबर झाला, रात्री व्हायचा क्लास; महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली
काँग्रेसने घेतली दखल, मोहम्मद यांना समज
या वादानंतर काँग्रेसने मोहम्मद यांच्या विधानांपासून हात झटकत ते पक्षाचे मत नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी सांगितले की, शमा मोहम्मद यांनी क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूबद्दल जे काही वक्तव्य केले, ते पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत नाही. त्यांना संबंधित सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टीकेनंतर पोस्ट हटवल्या, पण वाद कायम
मोठ्या टीकेनंतर शमा मोहम्मद यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले असले तरी वाद संपलेला नाही. भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मोहम्मद यांनी रोहित शर्माला माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एम. एस. धोनी, विराट कोहली, कपिल देव, रवी शास्त्री यांच्याशी तुलना करत त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचा खेळाडू असल्याचे म्हटले होते.
मुंबईच्या प्रॉपर्टी बाजारात खळबळ! अख्ख्या इमारतीची खरेदी
काँग्रेसची स्पष्ट भूमिका
काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खेळाडूंच्या योगदानाचा मोठा आदर करते आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे कोणतेही विधान मान्य करत नाही.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत रोहितने 15 धावा केल्या होत्या. स्पर्धेत भारतीय संघ सध्या अपराजित असून,आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.