सॅम अयुबने टी-20 ऑलराऊंडरच्या क्रमवारीमध्ये हार्दिक पांड्याला पहिल्या क्रमांकावरून खाली खेचलं आहे. या क्रमवारीमध्ये हार्दिक पांड्या आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे हार्दिक पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये खेळू शकला नव्हता. ऑलराऊंडरच्या क्रमवारीमध्ये अक्षर पटेल एक स्थान वरती 10व्या क्रमांकावर आला आहे.
सॅम अयुब कसा झाला नंबर वन?
आशिया कपच्या 7 सामन्यांमध्ये सॅम अयुब तब्बल 4 सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला, तर उरलेल्या 3 सामन्यांमध्ये त्याने 37 रन केले, पण 7 मॅचमध्ये 8 विकेट घेतल्यामुळे सॅम अयुब ऑलराऊंडरच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
advertisement
टॉप-10 बॅटरमध्ये 3 भारतीय
दुसरीकडे टी-20 क्रमवारीत टॉप-10 बॅटरमध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अभिषेक शर्मा टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर तर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया कपमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला क्रमवारीमध्ये दोन स्थानांचा फटका बसला आहे. सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बॉलरच्या क्रमवारीमध्ये वरुण चक्रवर्ती पहिल्या क्रमांकावर आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये 4 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला 9 स्थानांचा फायदा झाला असून तो 12व्या क्रमांकावर आला आहे. तर देशांच्या टी-20 क्रमवारीमध्येही टीम इंडियाने पहिला क्रमांक कायम राखला आहे.