पाकव्याप्त काश्मीर (POK) चा उल्लेख पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणून करतं. पण भारताच्या या भूभागावर पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केला आहे, त्यामुळे भारत या भागाचा उल्लेख कायमच पाकव्याप्त काश्मीर असा करतो.
चाहते सना मीरवर संतप्त
सना मीरच्या या विधानामुळे देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला टॅग करून सना मीरला कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. सना मीरच्या या वादग्रस्त विधानावर बीसीसीआय काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयसीसीने खेळामध्ये राजकारण आणण्याविरोधात कठोर नियम स्थापित केले आहेत, त्यातच आता सना मीरने आयसीसीच्या स्पर्धेमध्येच असं विधान केलं आहे, त्यामुळे आयसीसी सना मीरवर कारवाई करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सना मीरने कॉमेंट्री करताना ही चूक जाणूनबुजून केली ही अजाणतेपणे झाली, हे स्पष्ट नाही, पण तिने हे विधान जाणूनबुजून केलं असेल, तर तो आयसीसीच्या नियमानुसार गुन्हा ठरू शकतो.