82 बॉलमध्ये ठोकलं शतक
काहीच दिवसांपूर्वी आयपीएलच्या पंजाब किंग्सचे दोन आक्रमक बॅटर प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग युवराजसोबत ट्रेनिंग करताना दिसले होते. आयपीएल 2025 मध्ये प्रियांश आर्याने फक्त 39 बॉलमध्ये शतक ठोकून इतिहास घडवला होता. आयपीएलमधल्या धमाकेदार कामगिरीनंतर प्रियांश आर्याची इंडिया ए मध्ये निवड झाली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक वनडेमध्ये प्रियांश आर्याने 82 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे.
advertisement
प्रियांशने मारले 11 फोर, 5 सिक्स
आर्याने त्याच्या या शतकी खेळीमध्ये 11 फोर आणि 5 सिक्स मारले. शतक पूर्ण केल्यानंतर दोनच बॉलमध्ये प्रियांशने स्पिनर तनवीर संघाच्या बॉलवर लॉन्ग-ऑफच्या फिल्डरकडे कॅच दिला. ऑस्ट्रेलिया ए ने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर प्रभसिमरन आणि प्रियांश या दोन्ही ओपनरनी 123 बॉलमध्येच 135 रनची पार्टनरशीप केली.
24 वर्षांच्या प्रियांश आर्याने सुरूवातीच्याच ओव्हरमध्ये कट मारून इनिंगची सुरूवात केली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. सॅम एलियटच्या बॉलिंगवर प्रियांशने पहिली सिक्स मारली. 60 बॉलमध्ये प्रियांशने त्याचं शतक पूर्ण केलं, यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आणखी प्रहार केला. पुढच्या 22 बॉलमध्ये प्रियांशने त्याचं शतक पूर्ण केलं. प्रियांश आर्याची इंडिया ए कडून ही पहिलीच मॅच आहे. फक्त एकाच वनडेसाठी त्याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली होती. कानपूरमध्ये होणाऱ्या पुढच्या दोन सामन्यांसाठी प्रियांशची जागा अभिषेक शर्मा घेणार आहे.
प्रियांश आर्याशिवाय इंडिया ए चा कर्णधार श्रेयस अय्यरनेही या सामन्यात शतकी खेळी केली. श्रेयसने 83 बॉलमध्ये 110 रन केले, ज्यात 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याशिवाय रियान परागने 67 आणि आयुष बदोनीने 50 रनची खेळी केली. बॅटरच्या या धमाकेदार कामगिरीमुळे इंडिया ए ने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून तब्बल 413 रन केले.