ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात फलंदाजी करण्यासाठी वैभव सुर्यवंशी आणि कर्णधार आयुष्य म्हात्रे मैदानात उतरले होते.पण भारताची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण कर्णधार आयुष्य म्हात्रे 21 धावांवर स्वस्तात बाद झाला होता.त्याच्यापाठोपाठ विहान मल्होत्राही अवघ्या 6 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदीने भारताचा डाव सावरला होता.
वैभव सुर्यवंशीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत 86 बॉलमध्ये 113 धावांची फटकेबाजी केली होती. या दरम्यान त्याने 8 गगनचुंबी षटकार आणि 9 चौकार लगावले होते. या खेळानंकर वेदांत त्रिवेदीने 140 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 19 चौकार लगावले आहे. या व्यतिरीक्त खिलान पटेलच्या 49 धावा वगळता इतर खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही.
advertisement
टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा या वेदांत त्रिवेदीने केल्या. त्यामुळे वेदांत त्रिवेदी वैभव सुर्यवंशीच्या फलंदाजीसमो भाव खाऊन गेल्या. तसेच वेदांत आणि वैभवच्या या शतकीय खेळीमुळे भारताचा पहिला डाव हा 428 धावांवर ऑल आऊट झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून हेडन स्चिलर आणि विल मालकझुकन प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. आर्यन शर्माने 2 आणि थॉमस पॅडीग्टनने 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलिया कडून स्टीवेन हॉगने 92 धावांची अर्धशतकीय खेळी केली. त्या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 243 धावांवर ऑल आऊट झाली होती. टीम इंडियाकडून दिपेश देवेंद्रनने 5, किशन कुमारने 3 तर अनमोलजित सिंह आणि खिलान पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया 185 धावांनी आघाडीवर आहे.