विराटसमोर मी अस्वस्थ होतो - ट्रेव्हिस हेड
विराट कोहली किती चांगला खेळाडू आहे, हेच त्याचं कारण आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध तो नेहमी धावा करतो. सामन्यातील त्याची उच्च ऊर्जा (High Energy) आणि तीव्रता (Intensity) खूप आश्चर्यकारक आहे. तो सतत तुमच्यावर दबाव टाकतो आणि नेहमी तुमच्या समोर असतो. अनेक लोक याबद्दल सहमत असतील असं मला वाटतं, असंही ट्रव्हिड हेड म्हणाला आहे.
advertisement
विराट नेहमीच डोकेदुखी ठरलाय
विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे आणि याच कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी तो नेहमीच डोकेदुखी ठरला आहे, असंही ट्रव्हिड हेड म्हणाला. स्टार स्पोर्टसोबत बोलताना ट्रेव्हिस हेडने असं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 T20I मॅचची सिरीज खेळणार आहे. हा दौरा 19 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 8 नोव्हेंबर पर्यंत चालेल. त्यासाठी शुभमन गिल याला वनडेची कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर हा व्हाईस कॅप्टन असेल.
भारताचा वनडे संघ : शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कॅप्टन), अक्षर पटेल, KL राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल.
भारताचा T20I संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.