रोहित शर्मा धोनीसारखी चूक करणार होता...
स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, रोहित शर्मांना इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जायचे होते आणि 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनीने जसे केले होते, त्याप्रमाणे मालिकेच्या मध्यभागी निवृत्त होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, बीसीसीआयने ही ऑफर नाकारली. या वृत्तानुसार, "निवडकर्त्यांना मालिकेदरम्यान सातत्य हवं होतं आणि त्यांनी शर्मांना मालिकेत सहभागी होण्याची संधी दिली, परंतु कर्णधार म्हणून नाही. त्यामुळे त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला." रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला आणि त्यानंतर काही दिवसांनी विराट कोहलीनेही तोच मार्ग अवलंबला. यामुळे आधुनिक क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीमुळे निवडकर्त्यांना मोठी पोकळी भरून काढण्याचे आव्हान पेलावं लागत आहे.
advertisement
अनौपचारिक चर्चा पण कॅप्टन कोण?
बीसीसीआयच्या निवड समितीने रोहितच्या कसोटी कर्णधारपदासाठी संभाव्य दावेदार म्हणून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्याशी 'अनौपचारिक चर्चा' केली आहे. इंग्लंड मालिकेसाठी संघाची घोषणा २३ मेच्या आसपास होण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांची नावे चर्चेत असली तरी, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, अशी माहिती देखील मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा
दरम्यान, बीसीसीआयच्या निवड समितीने रोहितच्या कसोटी कर्णधारपदासाठी संभाव्य दावेदार म्हणून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्याशी 'अनौपचारिक चर्चा' केली आहे. इंग्लंड मालिकेसाठी संघाची घोषणा 23 मे च्या आसपास होण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांची नावे चर्चेत असली तरी, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे केएल राहुल याला विराट कोहलीची जागा भरून काढावी लागेल.