दुबई: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियवर सुरू आहे. या लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या फलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासून धक्का देण्यास सुरूवात केली. यातील सर्वात मोठा ट्विस्ट मॅचच्या 13व्या ओव्हरमध्ये आला.
advertisement
टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अनुक्रमे हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहने धक्का दिले. या दोन विकेटमुळे पाकिस्तानचा संघ सावरला नाही. त्यांनी नियमीत अंतराने विकेट गमावल्या.
भारताकडून 13वी ओव्हर टाकण्यासाठी कुलदीप यादव आला. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2 धाव घेतली. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसरा चेंडू कुलदीपने ऑफसाइडवरून गुगली टाकला होता. पाकिस्तानी फलंदाज हसन नवाझने तो मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हवेत कुलदीपच्या दिशेने गेला. कॅच थोडा कठीण होता, पण कुलदीपने प्रयत्न केला आणि चेंडू हाताला लागून झेल सुटला.
कॅच सुटला पण...
कुलदीपच्या हातातून कॅच सुटल्याने भारतीय चाहते थोडे निराश झाले. पण कुलदीपने दुसऱ्याच चेंडूवर कमाल केली. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हसन नवाझला बाद केले. कुलदीपने टाकलेला फ्लाइटेड चेंडू नवाजने मोठा slog-sweep मारायचा प्रयत्न केला. पण चेंडू टॉप-एज लागून हवेत गेला आणि अक्षरने सोपा झेल पकडला. या विकेटमुळे पाकिस्तानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र कुलदीप एवढ्यावर थांबला नाही.
ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कुलदीपने मोहम्मद नवाझला lbw बाद केले. या निर्णयावर त्याने रिव्ह्यू घेतला. मात्र रिप्लेमध्ये बॉल-ट्रॅकिंगने दाखवले की चेंडू थेट लेग स्टंपवर जात होता. त्यामुळे तिसऱ्या अंपायरने नवाझला बाद दिले आणि तो गोल्डन डकवर बाद झाला. यामुळे कुलदीपला हॅटट्रिकची संधी चालून आली. पण अखेरच्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली नाही.
कुलदीपची हॅटट्रिक पूर्ण झाली नसली तरी या ओव्हरमुळे पाकिस्तानच्या मधळ्या फळीतील फलंदाज झटपट माघारी गेले.
त्याआधी कुलदीपने साहिबजादा फरहान 40 धावांवर बाद केले होते. या सामन्यात कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 127 धावा करता आल्या.
कुलदीप यादव विरुद्ध पाकिस्तान (सर्व फॉरमॅटमध्ये कामगिरी)
1/37
2/41
2/32
5/25
2/35
3/40
3/18