गंभीरसह दोनच खेळाडू रवाना
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा या वनडे खेळणाऱ्या खेळाडूंना आता घरी पाठवण्यात आलं असून गौतम गंभीरसह टीम इंडियाचे दोन खेळाडू थेट कटकला रवाना झाले आहेत.
टीम इंडियात 9 खेळाडूंची एन्ट्री
advertisement
टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळेल. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या 9 खेळाडूंना टीम इंडियाच्या आगामी सामन्यात कटकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
पहिला टी-ट्वेंटी सामना कधी?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-ट्वेंटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर खेळलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे, जो 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होता. भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एक जिंकला आहे आणि एक हरला आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
