ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर टीम इंडियाने काही दिवस विश्रांती घेतली होती.त्यानंतर संघ पुन्हा मैदानात परतला आहे आणि प्रॅक्टीसला सूरूवात झाली आहे. दरम्यान आजच्या सराव सत्रात शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी सारखे खेळाडू सहभागी झाले होते.पण यावेळी बुमराहच्या एका फोटोने धाकधूक वाढली आहे.
advertisement
आजच्या सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अर्धा तास वॉर्मअप केला.त्यानंतर त्याने एक छोटासा रन-अप घेतला आणि तो ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. पण ज्यावेळेस तो मैदानावर होता त्यावेळेस त्याच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसली.त्यामुळे ही पट्टी पाहूनच सगळ्यांना धक्का बसला होता. आता जर जसप्रीत बुमराह जर पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला तर टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीर, सीतांशू कोटक आणि मॉर्ने मोर्केल यांच्यासह 10 मिनिटे खेळपट्टीची पाहणी करून झाली. त्यानंतर गंभीरने क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्याशीही चर्चा केली. पहिल्या कसोटीपूर्वी, भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे की त्यांनी ध्रुव जुरेलला ऋषभ पंतसोबत फलंदाज म्हणून खेळवायचे की सुदर्शनसोबत खेळवायचे. किमान, या सराव सत्रातून काहीही निश्चित झालेले नाही, कारण गिल, जयस्वाल आणि सुदर्शन आधीच नेटमध्ये गेले आहेत. आता यावर का निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारताचा कसोटी संघ :
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत विकेटकिपर/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरान मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन्ने.
