कोलकाता टेस्टपूर्वी आज टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने संघ संयोजन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड न झाल्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे. "शमी भाईसारखे गोलंदाज खूप दुर्मिळ आहेत.परंतु आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, बुमराह आणि सिराज यांच्या अलीकडील कामगिरीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही पुढील कसोटी मालिका कुठे खेळणार आहोत हे देखील पाहत आहोत.तसेच निवडकर्ते यावर चांगले उत्तर देऊ शकतात,असे म्हणत त्याने निवडीवर स्पष्ट भाष्य करणे टाळले.
advertisement
"दोन कसोटी सामने आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण हेच सामने WTC फायनलपर्यंतचा आमचा मार्ग निश्चित करतील.दक्षिण आफ्रिका हा एक अतिशय मजबूत संघ आहे; ते चॅम्पियन आहेत. कठीण काळात आम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.खेळपट्टी देखील चांगली आहे, ती सामान्य भारतीय खेळपट्टीसारखी दिसते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतर लगेचच रेड-बॉल क्रिकेटमध्ये परतणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. परंतु एक व्यावसायिक खेळाडू म्हणून, तुम्हाला स्वतःला सांभाळावे लागते, असे देखील शुभमन गिल म्हणाला आहे.
"हे शहर माझ्यासाठी खूप भावनिक आहे. माझी आयपीएल कारकीर्द येथून सुरू झाली.पंजाब येथे असल्यासारखे वाटते." सहा वर्षांपूर्वी मी संघाचा भाग होतो, पण मी येथे एकही सामना खेळलो नव्हतो. तो गुलाबी चेंडूचा कसोटी सामना होता आणि आता मी येथे कर्णधार म्हणून खेळत आहे आणि ही एक अतिशय खास भावना असल्याचेही शुभमन गिलने सांगितले.
"आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. ते उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांची आकडेवारी ते सिद्ध करते. ही मालिका खूप रोमांचक असेल. दक्षिण आफ्रिकेने गेल्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. तथापि, आमच्या घरच्या परिस्थितीत खेळणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. पण ते चॅम्पियन आहेत आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम द्यावे लागेल, असे देखील शुभमन गिलने सांगितले.
शुभमन गिल पुढे म्हणाला, "माझी तयारी मी फलंदाज म्हणून कसे यशस्वी होऊ शकतो यावर केंद्रित आहे. कर्णधारपद भूषवताना, मी माझ्या ताकदीवर अवलंबून असतो. हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. संघ संयोजन जवळजवळ अंतिम झाले आहे. संध्याकाळी येथील प्रकाश लवकर कमी होतो, म्हणून जलद गोलंदाजांना सकाळी आणि अंतिम सत्रात मदत मिळते. परंतु भारतीय परिस्थितीत, फिरकीपटू खेळ ठरवतात."
"भारतात रिव्हर्स स्विंग हा महत्त्वाचा असतो. २०२४ च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाज किती महत्त्वाचे होते हे तुम्ही पाहीले. परदेश दौऱ्यांवर कामाचा ताण जास्त असतो कारण त्यांना लांब स्पेलची आवश्यकता असते. अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू किंवा अतिरिक्त फिरकी गोलंदाज निवडणे नेहमीच कठीण असते. म्हणून, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करणे हा एक निर्णय आहे. मी अजूनही ते कसे व्यवस्थापित करायचे ते शिकत आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करणे आणि स्वरूप बदलणे आव्हानात्मक आहे. परंतु माझ्यासाठी ते मानसिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक आहे; शारीरिकदृष्ट्या, मी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे जाणवते. हा एक चांगला शिकण्याचा मार्ग आहे, असे देखील गिल म्हणाला.
