दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी गिलच्या मानेला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दोन्ही टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळू शकला नव्हता. यानंतर त्याने टी-20 सीरिजसाठी कमबॅक केलं, पण पहिल्या तीनही सामन्यांमध्ये गिलची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात गिल 4 रनवर तर दुसऱ्या सामन्यात पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. तर तिसऱ्या टी-20 मध्ये गिलने 28 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली, यावरून गिलने स्वत:चं टीममधलं स्थान वाचवण्यासाठी स्वार्थी खेळी केल्याची टीकाही चाहत्यांनी केली.
advertisement
मागच्या 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या फक्त 7 मॅच शिल्लक आहेत, त्यातच शुभमन गिलची ही कामगिरी टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी आहे. आता चौथ्या टी-20 सामन्यात गिल पायाच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, त्यामुळे गिलऐवजी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं जवळपास निश्चित आहे.
शुभमन गिलने 36 टी-20 सामन्यांमध्ये 138.60 चा स्ट्राईक रेट आणि 28.03 च्या सरासरीने 869 रन केले आहेत, यात 3 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. गिलचं टी-20 आंतरराष्ट्रीयमधील एकमेव शतक न्यूझीलंडविरुद्ध आलं आहे. तर 3 टी-20 अर्धशतकांपैकी दोन अर्धशतकं वेस्ट इंडिज आणि एक झिम्बाब्वेविरुद्ध आहे. गिलच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या या कामगिरीमुळे त्याचं भारताच्या टी-20 टीममधील स्थानही धोक्यात आलं आहे.
