साई सुदर्शनला 8 इनिंगमध्ये एकदाही मोठी खेळी करता आलेली नाही, तरीही त्याला महत्त्वाच्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक प्रतिभावान खेळाडू संधी मिळत नसल्यामुळे बेंचवरच बसून आहेत. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सकडून खेळताना धमाकेदार बॅटिंग केली. यानंतर त्याची भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली, पण आयपीएलसारखी कामगिरी साई सुदर्शनला टेस्ट क्रिकेटमध्ये करता आली नाही.
advertisement
साई सुदर्शनच्या तंत्रात दोष?
मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि तामीळनाडूचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी इंग्लंड दौऱ्यात साई सुदर्शनची टीममध्ये निवड झाली, तेव्हाच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'साई सुदर्शन त्याच्या शरिरापासून लांब खेळतो, तसंच स्विंग होणाऱ्या बॉलसमोर खेळताना तो संघर्ष करतो, ज्यामुळे इंग्लंडमधल्या ड्युक्स बॉलने खेळताना साई सुदर्शन किती यशस्वी होईल, याबद्दल मला शंका आहे', असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले होते. साई सुदर्शनचं प्रथम श्रेणीचे रेकॉर्डही तितकं मजबूत नाही. साई सुदर्शनला टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी सरळ खेळावं लागेल, स्विंग होणाऱ्या बॉलसमोर तंत्र सुधारावं लागेल, तसंच काही शॉट मारण्यापासून स्वत:ला रोखावं लागेल, असा सल्लाही सुलक्षण कुलकर्णी यांनी दिला होता.