संयमी पार्टनरशिप करत डाव सावरला
काल टागेरेन चंद्रपॉल आणि अलिक अथानाझे यांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप केली, पण ती तुटताच पाहुण्या टीमचा वेग मंदावला आणि त्यांची अवस्था 107/4 अशी झाली. त्यानंतर टीम इंडियाने आक्रमक बॉलिंगचं प्रदर्शन केलं. शाई होप आणि टी इलमाच यांनी संयमी पार्टनरशिप करत डाव सावरला. मात्र, सकाळच्या सत्रात कुलदीप यादवने उत्कृष्ट बॉलिंग करत हे दोन्ही बॅटर्स लागोपाठ आऊट केले आणि सामन्याचे चित्र बदलले. त्याने लवकरच आणखी एक विकेट घेतली आणि ग्रीव्हजला आऊट करून भारताची सामन्यावरील ताबा आणखी मजबूत केला.
advertisement
भारताच्या बॉलर्सचा कस काढला
पिएर आणि फिलिप यांनी नवव्या विकेटसाठी 46 धावांची पार्टनरशिप करत वेस्ट इंडिजच्या इनिंगला काही प्रमाणात सन्मान मिळवून दिला. मात्र, लंच ब्रेकनंतर बुमराहने लगेच पिएरला क्लीन बोल्ड केले. दहाव्या विकेटसाठी फिलिप आणि सिल्स यांनी भारताच्या बॉलर्सचा चांगलाच कस काढला. अखेर कुलदीप यादवने विकेट काढली अन् आपल्या पाच विकेट्स पूर्ण देखील केल्या.
कुलदीपच्या पाच विकेट्स
दरम्यान, फिलिपने बुमराहविरुद्ध उत्तम डिफेन्स दाखवला, तर सिल्सने खासकरून कुलदीप यादवविरुद्ध सकारात्मक ध्येय दाखवलं. सिल्स हा कुलदीपची पाचवी विकेट ठरला, कारण तो कुलदीपच्या अचूक गुगलीवर आऊट झाला. आता दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिज कोणता दृष्टिकोन ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.